ETV Bharat / city

अमरावतीत एसटी संपामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल - ST workers strike in Amravati Maharashtra

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करावे यासाठी एक महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन (ST Workers Strike) सुरू आहे. मात्र, यामुळे शाळा महाविद्यालय गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र प्रचंड हाल (Students are Suffering due to St Strike) होत आहे.

Etv Bharat Special
Etv Bharat Special
author img

By

Published : Dec 6, 2021, 8:06 PM IST

Updated : Dec 16, 2021, 3:59 PM IST

अमरावती : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करावे यासाठी एक महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन (ST Workers Strike) सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली. तरीही कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहे. एसटीची सेवा ठप्प असल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह आता विद्यार्थ्यांनादेखील बसत आहे. दिवाळीपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहे. परिणामी शाळा महाविद्यालय गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र प्रचंड हाल (Students are Suffering due to St Strike) होत आहे.

एसटी संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल

कडाक्याच्या थंडीत सायकल घेऊन महाविद्यालय शाळा गाठताना अनेक विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एका दिवशी महाविद्यालयात जाण्यासाठी जवळपास सोळा ते वीस किलोमीटर सायकल चालवावी लागल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. सरकारने आणि एसटी कर्मचाऱ्यांनी यावर तोडगा काढून एसटी पुन्हा सुरू करावी अशी मागणी या विद्यार्थिनींनी केली आहे.

शाळेत कसे जाणार याचा प्रश्न
शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शहराकडे व गावानजीकच्या मोठ्या गावांमध्ये धाव घेत असतात. शाळा गाठण्यासाठी विद्यार्थी एसटीने दररोज प्रवास करतात. परंतु, एसटी बंद असल्याने शाळा महाविद्यालय गाठावे कसे असा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी सायकलने आपल्या शाळेत महाविद्यालयात जात आहेत. मात्र, सायकल नसलेल्या विद्यार्थ्यांकडे सायकल नाही अशा विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

म्हणून अभ्यासावर होते दुर्लक्ष
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील धोत्रा येथिल जवळपास पंधरा ते वीस विद्यार्थी हे गुरुदेव नगर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. धोत्रा ते गुरुदेव नगर हे अंतर ८-१० किलोमीटर आहे .त्यामुळे जाणे आणि येणे हे अंतर १६-२० किलोमीटर पर्यंत आहे.पूर्वी हे विद्यार्थी बस ने प्रवास करत होते.परन्तु आता त्यांना सायकल जावे लागते..त्यामुळे दोन ते तीन तास या मध्ये वेळ जातो त्यामुळे अभ्यासावर दुर्लक्ष होत असल्याचं विद्यार्थीनी म्हटलं आहे..

झाडाखाली विश्रांती अन् तिथंच अभ्यास
या विद्यार्थिनींनी परत येताना एका झाडाखाली थांबुन विश्रांती घेतात आणि तिथेच थोडे फार वाचन देखील करत असल्याचा या विद्यार्थिनींनी सांगितल. ग्रामीण भागातले रस्ते खराब असल्यामुळे सायकल चालवताना अनेक अडचणी येतात तसेच अपघात होण्याचीही शक्यता असल्याचा या विद्यार्थिनींच म्हणणं आहे.

खाजगी वाहनाकडून सुरू आहे प्रचंड लूट
एसटी बंद असल्यामुळे खाजगी वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. जे विद्यार्थी अमरावती शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात अशा विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. यामध्ये खाजगी वाहन कडून अव्वाच्यासव्वा तिकीट वसूल केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ते परवडतही नाही.
हेही वाचा - Movie on Mahatma Phule Life : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावरील चित्रपटासाठी सव्वा दोन कोटी रुपये मंजूर

Last Updated : Dec 16, 2021, 3:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.