अमरावती : ईद ( Eid E Milad ) निमित्त रविवारी परतवाडा शहरात काढण्यात आलेल्या जुलूस मध्ये आक्षेपार्ह गाणे वाजल्यामुळे ( offensive song played in procession ) तणाव निर्माण झाला. यासंदर्भात पोलिसांनी सोमवारी रात्री आठ ते दहा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
सर तन से जुदा अशा आशयाचे गाणे : रविवारी दुपारी परतवाडा शहरात महावीर चौक पेन्शनपुरा परिसरात ईद निमित्त निघालेल्या जुलूस मध्ये सर तन से जुदा अशा आशयाचे गाणे वाजले. हे गाणे वाजताच जुलूस मधील सहभागी तरुणांचा उत्साह द्विगुणीत झाला आणि त्यांच्या हावभावामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने काही काळ तणाव पसरला होता. या गंभीर प्रकरणासंदर्भात भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी सोमवारी परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली याप्रकरणी पोलिसांनी कलम 153, 505, तसेच उपकलम दोन आणि 134 कायद्यानुसार गुन्हा दाखल केला सीसीटीव्ही आणि व्हिडिओवरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
आरोपींवर त्वरित कारवाई करण्याची खासदार बोंडे यांची मागणी : परतवाडा येथे ईद निमित्त निघालेल्या ज्युस मध्ये जे काही गाणे वाजले ते धार्मिक तणाव निर्माण करणारे होते. हे गाणे वाजत असतानाच जुलूस मध्ये सहभागी तरुणांकडून देखील सर तन से जुदा असे नारे देण्यात आले. ईद निमित्त जुलूस काढणे गैर नव्हे मात्र दुसऱ्याचा जीव घेण्याबाबत घोषणाबाजी करणे चुकीचे आहे. हा संपूर्ण प्रकार पी एफ आय च्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशी मानसिकता पी एफ आय द्वारे मुस्लिम समाजात पसरविली जात आहे. या लोकांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
दोघांना अटक इतरांचा शोध सुरू : रविवारी दुपारी परतवाडा शहरात महावीर चौक पेन्शनपुरा परिसरात ईद निमित्त निघालेल्या जुलूस मध्ये सर तन से जुदा अशा आशयाचे गाणे वाजवले. यासह या आशयाच्या घोषणा देखील देण्यात आल्या. या प्रकरणात पोलिसांनी आज धार्मिक तेढ निर्माण करण्याप्रकरणी शेख राहील आणि शेख हशम कादर या दोघांना अटक केली. या प्रकरणात इतर आठ ते दहा जण अद्यापही फरार आहेत. त्यांना सुद्धा लवकर पकडण्यात येईल असे परतवाडा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
शहरात तणावपूर्ण शांतता : इच्छा जुलूस मध्ये दोन समाजात ते निर्माण होईल अशा घोषणा देण्यात आल्या तसेच गाणेही वाजवण्यात आले. या प्रकारामुळे परतवाडा आणि लगतच्या अचलपूर शहरात रविवारी तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता तिकडे यांनी या प्रकरणात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली तसेच खासदार अनिल मुंडे यांनी देखील या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली होती. आज पोलिसांनी दोघांना अटक केली असून परतवाडा येथील संवेदनशील परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सध्या परतवाड्यात तणावपूर्ण शांतता आहे.