अमरावती शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे सरकार मध्ये सर्वात शेवटी आलेले आमदार संतोष बांगर यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. रविवारी अंजनगांव सुर्जी येथील मठातून दर्शन करुन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोलकरित पन्नास खोके एकदम ओकेचे नारे दिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.
अशी आहे घटना आमदार संतोष बांगर हे शिवसेनेतून सर्वात शेवटी शिंदे गटात सामील होणारे आमदार आहेत. एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचेसोबत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र अचानक दुसरे दिवशी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. आज ते दुपारी ३ वाजता अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनाकरीता आल्याची कुणकूण तालुक्यातील शिवसैनीकांना लागली. शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनीक लाला चौकात गोळा झाले. सहा वाजताचे दरम्यान आमदार बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओकेचे नारे देत त्यांच्या गाडीवर हातांनी बुक्या मारत नारेबाजी केली. यावेळी आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होत आहे हे कळले नाही. सदर घटनेने काही वेळ लाला चौकात एकच खळबळ उडाली होती.