ETV Bharat / city

Shivsainik Returned : राणा दाम्पत्याला अटक, अमरावतीतील राणांच्या घरासमोरून शिवसैनिक परतले - Shivsainik Protest In Front Rana Home

मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणून आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या खासदार नवनीत ( MP Navneet Rana ) व आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांना मुंबई पोलिसांनी अटक ( Mumbai Police Arrested Rana Couple ) केली. राणा यांच्या अमरावतीतील घरासमोर ठिय्या देत बसलेले शिवसैनिक ( Shivsainik Protest In Front Rana Home ) राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर घरी परतले ( Shivsainik Returned From Rana Home ) आहेत.

Shivsainik Returned From Rana Home
राणांच्या घरासमोरून शिवसैनिक परतले
author img

By

Published : Apr 23, 2022, 7:48 PM IST

अमरावती : खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) , आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांना मुंबई पोलिसांनी अटक ( Mumbai Police Arrested Rana Couple ) केल्यानंतर अमरावतीत सकाळी साडेदहा वाजल्यापासून त्यांच्या घरासमोर आंदोलन करणारे शिवसैनिक ( Shivsainik Protest In Front Rana Home ) सायंकाळी पावणेसात वाजता परतले ( Shivsainik Returned From Rana Home ) आहेत.

महाप्रसाद देणारच : शनिवारी दिवसभर राणा यांच्या घरासमोर आंदोलन करणारे शिवसैनिक आता परतले असले तरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्या राणा यांना आम्ही महाप्रसाद देणारच असे शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख सागर देशमुख यांनी म्हटले आहे. राणा यांनी आता शिवसेनेच्या विरोधात अजिबात काही बोलू नये. यापुढे खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना त्यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांबाबत आम्ही ठोसा देऊ, असे देखील सागर देशमुख यांनी म्हटले आहे.

अमरावतीतील राणांच्या घरासमोरून शिवसैनिक परतले

पोलिसांचा बंदोबस्त कायम : राणा यांच्या घरासमोरून परतणाऱ्या शिवसैनिकांनी वरून आदेश आला तर, आम्ही पुन्हा राणा यांच्या घरासमोर धडकणार असा इशारा दिला असल्यामुळे राणा यांच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. सकाळी सात वाजल्यापासून आमदार राणा यांच्या घरासमोर आठ ते दहा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. साडेदहा वाजण्याच्या सुमारास शिवसैनिक राणा यांच्या घरासमोर पोहोचल्यावर अकरा वाजता पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलविण्यात आली. दंगा नियंत्रण पथक देखील राणा यांच्या घरासमोर तैनात करण्यात आले. राणा यांच्या घरासमोरून राजापेठ तसेच फरशी स्टॉपकडे जाणारा मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला होता. दिवसभर शिवसैनिकांनी राणा यांच्या घरासमोर घोषणाबाजी केली. काही शिवसैनिकांनी राणा यांच्या घरावर दगड फेकले. राणा यांच्या घरासमोर लागलेल्या बॅरिकेट्स तोडून सोडण्याचा प्रयत्न देखील शिवसैनिकांनी केला होता. शिवसैनिकांनी हनुमान चालिसा पठण देखील राणा यांच्या घरासमोर केले. शिवसैनिक आता परतले असले तरी, संपूर्ण परिस्थिती सुरळीत होईस्तोवर राणा यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त कायम राहणार आहे.

हेही वाचा : Video : नवनीत राणा पोलिसांवर भडकल्या.. म्हणाल्या, 'आम्ही लोकप्रतिनिधी, तुम्ही आम्हाला असं घेऊन जाऊ शकत नाही'..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.