ETV Bharat / city

अमरावतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मामींनी घेतली कोरोनाची लस - नितीन गडकरी यांच्या ममी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ८८ वर्षाच्या मामी शारदा रहाटगावकर यांनी देखील कोरोनाची लस घेतली आहे. तसेच प्रत्येकाने स्वयंपूर्तीने येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन रहाटगावकर यांनी केले.

COVID 19 Vaccine
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मामी
author img

By

Published : Mar 6, 2021, 9:01 AM IST

अमरावती- राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातही या लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या लसीकरणाच्या मोहिमेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ८८ वर्षाच्या मामी शारदा रहाटगावकर यांनी देखील कोरोनाची लस घेतली आहे. तसेच प्रत्येकाने स्वयंपूर्तीने येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन रहाटगावकर यांनी केले.

गडकरी यांच्या 88 वर्षांच्या मामींनी घेतली कोरोनाची लस..
अमरावती जिल्ह्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सद्यस्थितीत ६० हजार डोस प्राप्त झालेले होते. लस मिळवण्यासाठी आधी नागरिकांना को-विन अॅपवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. ज्या लोकांकडे मोबाईल नाही किंवा ज्यांना मोबाईलची माहिती नाही, त्या नागरिकांना टोल फ्री नंबरवर फोन करून लसीकरणाची नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर लसीकरण केंद्रावर आधार कार्ड आणून त्यांना लाभ घेता येईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.