ETV Bharat / city

अमरावती : अंबादेवी मंदिरासमोर भाजपाचे 'शंखनाद आंदोलन'; मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

author img

By

Published : Aug 31, 2021, 2:36 AM IST

आज जिल्हा भाजपातर्फे अंबादेवी मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. राज्य सरकारने तत्काळ मंदिरे उघडावी, अशी मागणी यावेळी भाजपाच्यावतीने करण्यात आली.

shankhanad agitation by bjp
shankhanad agitation by bjp

अमरावती - मंदिरे उघडावी या मागणीसाठी आज जिल्हा भाजपातर्फे अंबादेवी मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. राज्यात दारूची दुकाने सुरू झाली आहेत. वरलीचे अड्डे, जुगार सुरू आहेत. सगळं काही सुरू असताना केवळ मंदिरात भाविक आले तरच कोरोना होतो, असा गैरसमज असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा झाला असल्याचा आरोप यावेळी भाजपातर्फे करण्यात आला.

प्रतिक्रिया

आमदार प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात आंदोलन

'मंदिराचे दार उघड उद्धवा' अशा घोषणा देत विधानपरिषद सदस्य आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, प्रा. रविंद्र खांडेकर, भाजपाच्या आध्यात्मिक आघाडी प्रमुख निलेश काजे, राहुल वाठोडकर महाराज आदी सहभागी होते. राज्यात आता कोरोनाचा कहर नसताना भर श्रावण महिन्यात सरकारने मंदिर बंद ठेवली आहेत. आज शिवसेनेची तालिबान सेना झाली असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी यावेळी केला. माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी राज्यभरातील मंदिर त्वरित उघडावे, ही आमची उद्धव ठाकरे यांना विनंती असल्याचे म्हटले.

हेही वाचा - अनिल परब यांना ईडीकडून समन्स, राज्यातील राजकीय वातावरण तापले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.