ETV Bharat / city

अमरावतीत रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड - अमरावती लेटेस्ट

अमरावती जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करून विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीत दोन सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड

author img

By

Published : May 12, 2021, 2:08 PM IST

अमरावती - राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. परंतु अमरावतीमध्ये डॉक्टरांकडूनच इंजेक्शनच्या काळाबाजार करून, त्याची चढ्या दरात विक्री केली जात आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मागील काही दिवसांपासून हे रॅकेट मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीरचा काळाबाजार करून विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने काल रात्री ११ वाजता पोलिसांनी बनावट ग्राहक बनून सापळा रचत छापेमारी केली.

माहिती देताना तपास अधिकारी

सहा जणांच्या मूसक्या आवळून पोलिसांनी केली अटक

काळाबाजार करून विक्री करणाऱ्या मध्ये तिवसा येथील शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन मालसुरे व भातकुली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय राठोड सह ४ खाजगी कर्मचारी अशा एकूण सहा जणांच्या मूसक्या पोलिसांनी आवळून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 10 रेमडेसिवीर इंजेक्शन सह 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या कारवाईमूळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे.

रुग्णालयातील इंजेक्शनची दहा ते बारा हजार रुपयांत बाहेर विक्री

तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयाचा शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन मालसुरे हा तिवसा येथिल रुग्णालयात आलेले रेमडेसिवीर इंजेक्शन हे अमरावती येथील एका लॅबच्या असिस्टंट ला पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. तेथून हा लॅब मधील असिस्टंट गरजू रुग्णांना दहा ते बारा हजार रुपयांपर्यत विक्री करत होता, अशी माहिती समोर आली आहे.

या आरोपींना केले आहे अटक

तिवसा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन मालसुरे, भातकुली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय राठोड, सुपर स्पेशलिटी रुग्णालय मधील अटेंडन शुभम सोनटक्के, शुभम कील्हेकर (महावीर हॉस्पिटल), जिल्हा सामान्य रुग्णालयातील परीचारीका पूनम सोनवणे, लॅब असिस्टंट अनिल गजानन पिंजरकर अशा एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - 'कोरोना संकटात केंद्र व राज्यांनी काहीही लपवू नये'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.