ETV Bharat / city

Amravati Shivaji Maharaj Statue : राजापेठ उड्डाणपुलावरच उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; मनपाकडून प्रस्ताव पारीत

author img

By

Published : Feb 17, 2022, 5:39 PM IST

Updated : Feb 17, 2022, 7:15 PM IST

आज अमरावती महापालिकेच्या सर्वसाधारण ( Rajapeth Shivaji Maharaj Statue ) सभेत राजापेठ उड्डाणपुलावर अटी व नियम तपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.

Rajapeth Shivaji maharaj Statue
Rajapeth Shivaji maharaj Statue

अमरावती - राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून महिनाभरापासून गदारोळ सुरू असताना आज अमरावती महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजापेठ उड्डाणपुलावर अटी व नियम तपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.

मनपाकडून प्रस्ताव पारीत

बसपाच्या प्रस्तावाला भाजपचे अनुमोदन -

राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांनी अनधिकृत पुतळा बसविल्यामुळे वाद उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बसपाचे गटनेते चेतन पवार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याकडून आर्थिक तसेच हवी ती मदत घेऊन महापालिकेच्यावतीने राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, असा प्रस्ताव मांडला. भाजपचे गटनेते सुनील काळे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन देत राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात कुठलीही हरकत नसावी, असे सभागृहासमोर म्हटले.

नियम आणि अटी, शर्ती तपासा -

राजापेठ येथील उड्डाणपूल हा रेल्वे प्रशासनाने उभारला आहे. या उड्डाणपुलावर पुतळा बसवता येतो का, यासंदर्भात रेल्वे प्रशासनाचे काय नियम आहेत किंवा काही अटी-शर्ती आहेत का? याचा अभ्यास करण्यात यावा. यासह महामार्ग प्राधिकरणाच्याही अटी, शर्ती तपासून मान्यता घेऊनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपुलावर बसवण्यात यावा, असे भाजपचे नगरसेवक तुषार भारतीय म्हणाले.

परवानगीविना उभारला होता शिवरायांचा पुतळा -

राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांनी 12 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनाधिकृतपणे बसविला होता. हा पुतळा बसविण्यासाठी आम्ही महापालिकेकडे परवानगी मागितली होती, असे आमदार रवी राणा यांच्यासह त्यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने वारंवार सांगण्यात येत होते. याबाबत भाजपचे नगरसेवक तुषार भारतीय यांनी अशा स्वरूपाचे पत्र आमदार रवि राणा यांच्याकडून महापालिकेकडे सादर करण्यात आले होते का, असा प्रश्न सभागृहात विचारला असता महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात संदर्भात कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही, असे स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकालाही मान्यता -

राजापेठ उड्डाणपुलावर सर्व अटी, नियम शर्ती तपासणी करूनच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अमरावती महापालिका उभारणार, यासह छत्री तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात येत असल्याचे महापौर चेतन गावंडे यांनी सभागृहात जाहीर केले.

हेही वाचा - Amravati Gold Theft : दर्यापूरातील एका लग्न समारंभात 100 ग्रॅम सोन्याची चोरी; आरोपी फरार

Last Updated : Feb 17, 2022, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.