अमरावती - अमरावतीत शिवाजी शिक्षण संस्थेची आज रविवारी निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीत राडा झाल्याची Rada in Shivaji Education Institute election माहिती समोर आली आहे. आमदार देवेंद्र भुयार यांना यात धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती आहे. शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक shivaji education institute election होत आहे. आज सकाळी आठ वाजता पासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदान केंद्रावर काही उमेदवार गुप्त पद्धतीने प्रचार करत असल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी clash between two groups झाली.
मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण - मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांबच रांगा लागल्या आहेत. अशातच काही काय सदस्य हे मतदान केंद्रामध्ये गुप्त पद्धतीने प्रचार करत असल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये राडा झाला आहे. मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण असून प्रगती पॅनल, विकास पॅनल पॅनलच्या सभासदांमध्ये राडा झाल्याने पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी मागवली आहे.
पोलिसांनी काहींना घेतले ताब्यात - महाराष्ट्रच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असलेल्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार माजी आमदार यांचा सक्रिय भाग आहे. विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना धक्का बुक्की झाली आहे. या दरम्यान वेगळे चित्र पहायला मिळाले आहे. प्रगती पॅनलचे हर्षवर्धन देशमुख, तसेच विकास पॅनलचे नरेशचंद्र ठाकरे मतदान केंद्राबाहेर हातात घेऊन बाहेर आल्यामुळे सर्वांच्या भुवाया उंचावल्या आहेत.
ठाणेदार चोरमले यांनी सांभाळला मोर्चा - गाडगे नगर पो.स्टे. ठाणेदार आसाराम चोरमले यांनी मोर्चा सांभाळत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.