ETV Bharat / city

Dussehra festival 2022 : 'या' दसरा महोत्सवाला 92 वर्षांचा इतिहास; चित्त थराराक होतात कवायती - दसरा महोत्सवाला 92 वर्षांचा इतिहास

अमरावतीच्या ग्रामदैवत श्री अंबादेवी ( Sri Ambadevi is the village deity of Amravati ) आणि श्री एकवीरा देवी यांचे सिमोल्लंघनासाठी अमरावती शहरातील दसरा मैदान ( Dussehra ground in Amravati city ) येथे दसरा मेळावा आयोजित केला जातो. काय आहे याचा इतिहास जाणूण घ्या....

Dussehra festival 2022
दसरा मेळावा
author img

By

Published : Oct 4, 2022, 1:02 PM IST

अमरावती : अमरावतीच्या ग्रामदैवत श्री अंबादेवी ( Sri Ambadevi is the village deity of Amravati ) आणि श्री एकवीरा देवी यांचे सिमोल्लंघनासाठी अमरावती शहरातील दसरा मैदान ( Dussehra ground in Amravati city ) येथे दसरा मेळावा आयोजित केला जातो. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने गत 92 वर्षांपासून हे आयोजन केले जात असून अतिशय शिस्तबद्धरीत्या युवक चित्त थरारक अशा कवायती या दसरा महोत्सवात सादर करतात.

1928 मध्ये झाली सुरुवात : भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी युवकांना सैनिकी प्रशिक्षण मिळावे यासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी इंडियन संरक्षण दलाची स्थापना केली. नवरात्रोत्सवात अमरावती शहरात श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त मोठी गर्दी होत असताना मंदिराच्या अगदी मागे असणाऱ्या श्री हनुमान व्यायाम शाळेत मात्र या दहा दिवसात युवकांना छुप्या पद्धतीने सैनिकी प्रशिक्षण दिले जायचे. या सैनिकी प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातूनच श्री हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने 1930 मध्ये श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी दसऱ्याच्या पर्वावर शहरातील सीमा ओलांडून परत मंदिराकडे वळतात त्याच ठिकाणी श्री हनुमान व्यायाम शाळेतील प्रशिक्षित युवकांकडून त्या स्थळावर कवायतींचे आयोजन करण्यास सुरुवात केली. आज हे ठिकाण अमरावती शहरातील दसरा मैदान म्हणून ओळखले जाते. 1930 आतापर्यंत दरवर्षी या ठिकाणी दसरा महोत्सव आयोजित करण्यात येतो आहे.

दसरा मेळावा

1947 पासून बदलली महोत्सवाची रूपरेषा : 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अमरावती शहरातील दसरा महोत्सवाची रूपरेषा बदलली. या महोत्सवात भारतीय पारंपरिक खेळासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यामध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन येथील तीन ते चार हजार विद्यार्थी विविध खेळांचे प्रात्यक्षिक सादर करतात . यामध्ये सामूहिक कराटे मल्लखांब जिम्नॅस्टिक मार्शल आर्ट लेझीम एरोबिक्स बॉडी बिल्डिंग रशियन ड्रिल ढाल तलवार दांडपट्टा भाला डंबेल्स तायकांडो आधी चित्त थरारक कवायती या दसरा महोत्सवात पाहायला मिळतात. राष्ट्रप्रेम राष्ट्रनिष्ठा तसेच राष्ट्र सन्मान याबरोबरच सामाजिक सेवा या उद्देशाने या दसऱ्या मेळाव्याची वाटचाल सुरू आहे.

25 राज्यातील युवकांचा समावेश : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन येथे देशातील विविध राज्यातून विद्यार्थी शिकायला येतात. सुमारे 25 राज्यातील विद्यार्थी या दसरा महोत्सवात कवायती सादर करतात. आदिवासी आश्रमातील विद्यार्थ्यांचा देखील या कवायती सादर करण्यात पुढाकार असतो.

पंधरा दिवसांपासून सराव : दसरा महोत्सवात सादर होणाऱ्या चित्त थरारक अशा कवायतींसाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील मैदानावर गट पंधरा दिवसांपासून सराव सुरू आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य आणि मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी चेंडके यांच्या मार्गदर्शनात हा सराव केला जातो आहे. शहरातील अनेक मान्यवर शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत दसऱ्याला सायंकाळी या कवायतींचा थरार अमरावतीकरांना अनुभवता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.