ETV Bharat / city

Amravati violence : राज्यातील दंगली पूर्वनियोजित, चौकशी व्हावी; देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस न्यूज अमरावती

सामाजिक सद्भाव बिघडला पाहिजे असा कोणाचा उद्देश होता का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी केली. अमरावतीत आले असता ते बोलत होते. त्रिपुरात (tripura violence) न घडलेल्या घटनांबाबत आठ तारखेला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट केले. त्यानंतर महाराष्ट्रात हे घडले, असा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला. रझा अकादमी (raza academy)वरही त्यांनी टीका केली.

devendra fadnavis
devendra fadnavis
author img

By

Published : Nov 21, 2021, 1:17 PM IST

Updated : Nov 21, 2021, 3:13 PM IST

अमरावती - राज्यात निघालेले मोर्चे कोणी प्लॅन केले, त्यांची भूमिका काय होती, सामाजिक सद्भाव बिघडला पाहिजे असा कोणाचा उद्देश होता का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी केली. अमरावतीत आले असता ते बोलत होते. त्रिपुरात (tripura violence) न घडलेल्या घटनांबाबत आठ तारखेला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट केले. त्यानंतर महाराष्ट्रात हे घडले, असा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला.

'कोणाचेही लांगुलचालन नको'

हिंसेचे समर्थन नाही. मात्र राज्य सरकार, अधिकारी 12 तारखेची घटना डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर लक्ष केंद्रीत करत आहे. 12 तारखेच्या घटनेवर कोणीही बोलण्यास तयार नाही. 13 तारखेची घटना 12ची प्रतिक्रिया आहे, असे ते म्हणाले. विशिष्ट धर्माला टार्गेट करणे आम्हाला मान्य नाही. मात्र कोणाचेही लांगुलचालन होता कामा नये.

'उत्स्फूर्त प्रतिक्रिया'

एका व्यक्तीवर 4-4 पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. अमरावती बंदची हाक आम्हीच दिली होती, मात्र स्वाभाविक स्वरुपात समाजातील सर्व त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. भाजपाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना अटक झाली हे चुकीचे आहे. निष्पाप लोकांना अटक करून 307 कलम लावले. अनेक लोकांवर सूड भावनेतून एकतर्फी केसेस लावल्या जात आहेत, असा आरोपही फडणवीस यांनी केला. पालकमंत्री यशोमती ठाकूर 12 तारखेच्या घटनेवर का बोलत नाहीत, असा सवालही त्यांनी केला आहे.

'रझा अकादमीवर बंदीची हिंमत आहे का?'

रझा अकादमी (raza academy) काँग्रेसच्या काळातच का पोलिसांवर हल्ले करते. ही कोणाची बी टीम आहे आणि कोणाची ए टीम आहे. त्यांचे कोणा नेत्यांसोबत फोटो आहेत, हे तपासावे. त्यावर बंदीची आम्ही मागणी घालतो. मात्र ती बंद करण्याची काँग्रेसची हिंमत आहे का, असा सवाल त्यांनी केला. देशभरात दंगली घडवून अल्पसंख्याकांना भडकावण्याचे काम काही पक्ष करत आहेत. मोदींच्या विकासाचा सामना करू शकत नाहीत, म्हणून अल्पसंख्याक समाजाला भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे फडणवीस म्हणाले.

Last Updated : Nov 21, 2021, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.