अमरावती - केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात आज हरियाणा आणि पंजाब मधील शेतकऱ्यांनी एक दिवसाच्या 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्यातही काँग्रेस पक्षाकडून एक दिवसीय आंदोलन केले जात आहे. अमरावती शहरातील इर्विन चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन एक दिवसीय उपोषणाला सुरुवात झाली आहे. या उपोषणात काँग्रेसचे आमदार पक्षाचे निरीक्षक कृनाल पाटील, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित लावली.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुर्वीपासून हीच भूमिका घेतली आहे. त्यांनी ही या कृषी कायद्याला विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आझाद मैदानातील आंदोलनात सहभाग दाखवला आहे. त्यामुळे आजच्या काँग्रेसच्या या आंदोलनाला देखील त्यांचा पाठिंबा आहे, असं आमदार कृनाल पाटील म्हणाले.
युपीए विषयी संजय राऊत यांनी बोलू नये-
आमचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी कालच स्पष्ट केलं आहे. जो शिवसेना पक्ष यूपीए त नाही त्या पक्षाने युपीए विषयी बोलू नये. अध्यक्ष पदाचा जो निर्णय आहे तो सर्व पक्ष एकत्र बसल्यावर घेईल. त्यामुळे शिवसेनेने याविषयी फार बोलू नये, असा सल्ला आमदार कृनाल पाटील यांनि संजय राऊत यांना दिला आहे.
हेही वाचा- मराठा आरक्षणावरील सुनावणी पूर्ण, सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय