अमरावती - शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी सहवेदना व्यक्त करत, राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या करणारे शेतकरी साहेबराव करपे यांच्या 34 व्या स्मृतीदिनी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता.
हेही वाचा... कोरोना इफेक्ट : गारगोटीत पार पडला केवळ 20 ते 25 नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा
यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने १९ मार्च १९८६ रोजी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून सहकुटुंब आत्महत्या केली होती. त्यावेळी शासन दरबारी आत्महत्येची पहिली नोंद घेण्यात आली होती. सध्या शेतकऱ्यांवर अनेक प्रकारे अन्याय होत आहेत. त्या सगळ्याची सुद्धा दखल शासनाने घ्यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.