अमरावती : दिवाळी सण म्हणटलं की ईतर खरेदी बरोबर गोड-धोड, मिठाई, फराळाचे तिखट-खारट पदार्थ हे सगळं डोळ्यापुढे उभं राहतं. आधी दिवाळीच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ भल्या मोठ्या प्रमाणात घरीच तयार केले जात होते. त्यात मिठाईचा देखील समावेश होता. आता बदलत्या काळानुसार आणि प्रचंड व्यस्त जिवनशैलीमुळे अधिकाधिक लोकं मिठाईच्या दुकानातुनच गोड पदार्थ व मिठाई विकत घेतात. त्यामुळे मिठाई विकणारे दुकानदार देखील खाद्यपदार्थांच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करीत असतात. अश्यातच अमरावती शहरातील रघुवीर मिठाई च्या वतीने यावर्षी सुवर्ण परवल ही खास सोन्याची मिठाई बाजारात आणली आहे. दिवाळीच्या पर्वावर सुवर्ण परवल ही मिठाई अमरावती करांचे तोंड गोड (On Diwali Occasion In Amravati Making Suwarn Parwal Mithai) करणार आहे. Diwali Food and Recipe
अशी आहे सुवर्ण परवल : सुवर्ण परवल ही मिठाई खास राजस्थानी कारागीरांकडून बनविण्यात आली आहे. यामध्ये मामरा, बदाम, काजू, पिसोळी, पिस्ता, शुद्ध केसर आणि सोन्याचा अर्क मिसळण्यात आला असल्याचे, रघुवीर मिठाईचे संचालक दिलीप पोपट यांनी 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना सांगितले.
बनविण्याची प्रक्रिया : सुवर्ण परवल मिठाई ही मामरा, बदाम, काजू, पिसोळी, पिस्ता, शुद्ध केसर आणि सोन्याचा अर्क, ईत्यादी मेवा मिसळवुन तयार करण्यात आली आहे. तसेच बाहेरच्या बाजुने द्खील पुर्णपणे सोन्याचा मुलामा (वर्क) लावण्यात आले आहे. त्यामुळे ही मिठाई बघताच खाणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटते.
दिवाळीत तयार केले जाणारे पदार्थ : दिवाळी मध्ये घरोघरी चिवडा, लाडू, चकली, शंकरपाडे, चिरवंट, शेव, ईत्यादी पदार्थ केले जातात. यासोबतच दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतांना मिठाई ठेवली जाते. त्यामुळे ईतर सणांपेक्षा दिवाळीत मिठाईला सर्वाधिक मागणी असते.
परदेशातही पोहोचविण्याची व्यवस्था : अमरावती शहरासह संपूर्ण विदर्भात रघुवीर मिठाईच्या वतीने बनविण्यात आलेली सुवर्ण परवल मिठाईला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्हणजे परदेशात असणाऱ्या विदर्भाती नागरिकांना देखील सुवर्ण परवलचा आस्वाद घेता यावा, यासाठी रघुवीर मिठाईच्या वतीने खास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था देखील केली आहे. रघुवीर मिठाईच्या दुकानात प्रत्येक दिवाळीतच काहीना काही नवीन व आकर्षक अश्या मिठाई ग्राहकांसाठी तयाक केली जाते. मात्र यंदा सुवर्ण परवल मिठाईच्या लोकप्रियतेमुळे दुकानाक ग्राहकांची अधिकच गर्दी दिसुन आली. Diwali Food and Recipe