अमरावती - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज अमरावती मध्यवर्ती बस स्थानक बंद करण्यात आले आहे. प्रशासनाने सकाळी बस स्थानकावर आलेल्या प्रवाशांना चक्क बस स्थानकाबाहेर काढून बस स्थानकाच्या दोन्ही दारांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहे.
अत्यावश्यक फेऱ्या राहणार सुरू
अकोल्यातून नागपूरला जाणाऱ्या किंवा नागपुरातून अकोला, बुलडाणा, औरंगाबादला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या अमरावती बस स्थानकावर येत आहेत. अत्यावश्यक सेवेसाठीच्या गाड्या अमरावतीच्या मध्यवर्ती बस स्थानकावरून सुरू आहे.
प्रवाशांना पोलिसांकडून सूचना
अमरावती बस स्थानकावरून प्रवाशांना बाहेर काढल्यावर प्रवाशांनी रस्त्यावर गर्दी केली. वृद्धांपासून लहान मुलांचा यात समावेश होता. बस स्थानक बंद केले असतानाही बस स्थानकासमोर जमलेल्या गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी माइकद्वारे आवाहन करून रस्ता मोकळा करण्यास सांगितले.
हेही वाचा - महाराष्ट्राला 'रेमडेसिव्हीर' देण्यास केंद्राची बंदी; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप