ETV Bharat / city

अमरावतीत कोरोनाचा कहर; शनिवारी आढळले 81 नवे रुग्ण - अमरावती कोरोना बातमी

अमरावतीत आतापर्यंत 1 हजार 228 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यापैकी 39 जणांचा मृत्यू झाला असून, 430 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 759 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

corona
अमरावतीत कोरोनाचा कहर
author img

By

Published : Jul 19, 2020, 2:20 AM IST

अमरावती - शहरात कोरोनाने कहर केला आहे. शनिवारी एकाच दिवसात 81 नवे कोरोना रुग्ण आढळले असून, कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 228 वर पोहचली आहे.

अमरावतीत जेल क्वार्टर, चिलम भाजीबाजार, नवजीवन कॉलनी, एकविरा नगर, तपोवन, गोपाळनगर, विजयपथ नगर, न्यु काँग्रेस नगर, रुक्मिणी नगर, बजर्नगँगर, चोराशीपुरा, रातनगंज, साजियानगर, तरखेडा, लुंबिनी नगर, धनुवाडी, आकोली रेल्वेस्टेशन मार्ग, रामपुरी कॅम्प, खोलपुरी गेट, गानुवाडी, सराफा बाजार, दसरा मैदान, खापर्डे बगीचा, प्रवीण नगर, बडनेरा मिल चाळ, हमलपुरा,उत्तमनगर, पलाश लाईन गाडगेनागर, कृष्णानगर, जयनगर आसिफनगर,गुरुनानक सोसायटी रुक्मिणी नगर, व्हिनसपार्क शेगाव नाका, नावसरी या परिसरात कोरोना रुग्ण आढळले आहेत.

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे तीन कोरोना रुग्ण आढळले. धारणी येथील विलगीकण कक्षात 5 रुग्ण आढळले. वरुड शहरात एक, नांदगाव खंडेश्वर शहरात एक, अंजनगाव सुर्जी येथे 2 महिला, भातकुली तालुक्यातील पूर्णानगर गावात 6 रुग्ण समोर आलेत. यावली शहीद गावात दोघांना कोरोना झाल्याचे समोर आले. नेर पिंगळाई आणि परतवाडा येथे प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळला.

अमरावतीत एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येत कोरोना रुग्ण आढळून आल्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी एकाच दिवशी सर्वाधिक 60 रुग्ण आढळले होते. अमरावतीत आतापर्यंत 1 हजार 228 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यापैकी 39 जणांचा मृत्यू झाला असून, 430 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 759 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.