ETV Bharat / city

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज अमरावतीला येणार, असं आहे दौऱ्याचं स्वरूप - हर्षवर्धन देशमुख निवास भेट शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आज अमरावतीला ( NCP leader Sharad Pawar will arrive in Amravati ) येणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुद्धा शरद पवार यांच्या सोबत अमरावतीला येणार आहेत.

NCP leader Sharad Pawar will arrive in Amravati
सांस्कृतिक भवन अमरावती शरद पवार
author img

By

Published : Apr 10, 2022, 9:41 AM IST

Updated : Apr 10, 2022, 9:55 AM IST

अमरावती - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आज अमरावतीला ( NCP leader Sharad Pawar will arrive in Amravati ) येणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुद्धा शरद पवार यांच्या सोबत अमरावतीत येणार आहेत.

शरद पवार यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त

हेही वाचा - NCP Agitation In Amravati : सिल्व्हर ओकवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

असा आहे शरद पवारांचा अमरावती दौरा - नागपूर विमानतळावरून नागपूर - अमरावती महामार्गावरून शरद पवार हे दुपारी एक वाजता अमरावतीत पोहचणार आहे. श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या निवासस्थानी ते भेट देणार असून, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या घरी दोन वाजता ते मोजक्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.

दुपारी अडीच वाजता श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. सव्वाचार वाजता माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भेटीसाठी शरद पवार हे त्यांच्या काँग्रेसनगर येथील निवासस्थानी जाणार आहेत. सायंकाळी पाच वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अमरावती विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांशी शरद पवार हे संवाद साधणार आहेत. सात वाजता शरद पवार नागपूरच्या दिशेने रवाना होतील.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे कार्यकर्त्यांशी संवाद हा शरद पवार यांचा मुख्य कार्यक्रम असून, सांस्कृतिक भवन परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

शरद पवारांच्या घरावर झाला होता हल्ला : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शुक्रवारी 8 एप्रिल रोजी आक्रमक स्वरूप ( ST Workers Protesting ) मिळाले. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर धडक ( ST Worker Agitation At Silver Oak ) दिली. या आंदोलनादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्यासह अजित पवार यांच्याविरोधात नारेबाजी करत त्यांच्या घरासमोर चप्पलफेक, दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलकांना यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. या आंदोलनातील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे.

हेही वाचा - आमदार रवी राणा यांची सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून चौकशी; महापालिका आयुक्तांवर शाई फेकल्याचे प्रकरण

Last Updated : Apr 10, 2022, 9:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.