ETV Bharat / city

Navneet Rana On Uddhav Thackeray जो दुसरो लिये खड्डा खोदेगा, वह पहिले गिरेगा; नवनीत राणांची उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल - मुंबई महानगरपालिका

Navneet Rana On Uddhav Thackeray येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) निवडणुकीत महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे, अशी टीका अमरावतीचे खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी केली आहे.

Navneet Rana On Uddhav Thackeray
Navneet Rana On Uddhav Thackeray
author img

By

Published : Sep 22, 2022, 5:51 PM IST

अमरावती येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) निवडणुकीत महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे, अशी टीका अमरावतीचे खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी केली आहे.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला होता. त्यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटासह अमित शाहचे समाचार घेतला होता. बोलताना ठाकरे म्हणाले होते की, सध्या गिधाडाची टोळी फिरत आहे. निजामच्या आदिलशाहीत आले आणि गेले. त्याच कुळातल्या अमित शहा, मी गदार शब्द मुद्दा वापरला. मुंबई संकटात असते, त्यावेळेस ही गिधाडे कुठे असतात. ही जमीन नाही, आमची मातृभूमी आहे. जो आमच्या आईवर वार करायला येईल, त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असे विधान ठाकरेंनी काल केले होते.

नवनीत राणांची उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

खासदार नवनीत राणांची टीका पुढे बोलताना म्हणाल्या की, कालच्या सभेमध्ये ज्या पद्धतीने ते अमित शहांना आवाहन करत होते. त्यामधून उद्धव ठाकरेंचा अहंकार बाहेर येत होता. जो दुसरो लिये खड्डा खोदेगा, वह पहिले गिरेगा अशा परखड शब्दात त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जाऊन झुकतात. या उद्धव ठाकरे यांच्या विधानावर टीका करतांना म्हणाल्या की, आपण मुख्यमंत्री असतांना दहा जनपथवर जाऊन किती वेळा लोटांगण घातले. हे संपूर्ण जनतेलाच माहिती असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

बाळासाहेबांचे विचार तुम्ही विसरल्यामुळेच अशी परिस्थिती झाली आहे. बाळासाहेबांनी मला माफ करावे, हे विचार कालच्या मेळाव्यात त्यांनी बोलणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी तसे न बोलता दुसऱ्यांवरच आगपाखड करण्यात धन्यता मानली असल्याचे वक्तव्य सुद्धा त्यांनी केले असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.