ETV Bharat / city

Threatening Letter To Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका? घराचीही रेकी केली? निनावी पत्रामुळे खळबळ - पोलीस आयुक्त

MP Navneet Rana : नवनीत राणा यांच्या घरी आलेल्या निनावी पत्रामुळे खळबळ उडाली आहे. लोक तुमच्या घरी जाऊन आले आहेत. तुम्हाला काहीही होऊ नये यासाठी मी प्रार्थना करतो. असे या निनावी पत्रात लिहीले आहे.

खासदार नवनीत राणा
खासदार नवनीत राणा
author img

By

Published : Jul 30, 2022, 11:05 AM IST

अमरावती - अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याचे निनावी पत्र गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी प्राप्त झाले आहे. काही संशयित लोक राजस्थान सीमेवरून अमरावती येथे आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्र पाठवणारी व्यक्ती अमरावती येथील आहे. तुम्ही माझी खूप मदत केली. मी तुमचा हितचिंतक आहे. म्हणून मी तुम्हाला सतर्क करत असल्याचे त्याने सांगितले आहे. पत्राच्या शेवटी- शेवटी खुदा हाफीस असे लिहिले असल्याने तो व्यक्ती अल्पसंख्याक असल्याचे वाटत आहे.

खासदार नवनीत राणा यांच्या शंकर नगर स्थित निवासस्थानी हे निनावी पत्र प्राप्त झाले आहे. या संदर्भात युवा स्वाभिमान संघटनेचे विनोद गुहे यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार दिली आहे. मी आपल्या शहरातील सर्व सामान्य व्यक्ती आहे. मी शासकीय नोकरी करत आहे. आपण माझी अनेक कामात मदत केली. कोरोना काळात आपण माझ्या वडिलांची मदत केली होती. काही लोक आपला पाठलाग करत असल्याची माहिती असून आपण सांभाळून राहावे, असे या पत्रात नमूद आहे. अमरावती शहरात राजस्थानच्या सीमेवरून काही संशयित लोक आले आहेत. हे लोक तुमच्या घरी येऊन गेले आहेत, अशी माहिती मला मिळाली आहे. असा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला आहे.

ही तर गंभीर बाब- आ.रवी राणा - संसदेच्या अधिवेशन सुरू असताना खासदारांच्या नावे जीवाला धोका असल्याबाबतचे पत्र येणे ही बाब गंभीर आहे. याप्रकरणी शासनाने दखल घेणे आवश्यक आहे. संशयित व्यक्ती अमरावतीत येऊन रिकी करत असतील, हे तर सुरक्षा यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह आहे. यामुळे पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.

पत्राची दखल घेत राजापेठ पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी खासदार, आमदार राणा यांचे निवासस्थानी भेट दिली आहे. एसीपी गायकवाड यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे. पोलीस यंत्रणा निनावी पत्राच्या आधारे शोध घेत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा - One village one Ganesha : एक गाव एक गणपती परंपरेने जपले आदर्श, अनेक गावांचा सामाजिक कार्यात सहभाग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.