ETV Bharat / city

दूध दान चळवळ: 'त्या' जुळ्या बाळांना दूध पाजण्यासाठी सरसावल्या स्तनदा माता - अमरावती स्तनदा माता बातमी

जुळ्या नवजात बाळांना अमरावतीतील होप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. एक मुलगा आणि एक मुलगी असणाऱ्या या दोन जुळ्या चिमुकल्यांना आईच्या दुधाची गरज भासली असताना ही गरज भागवण्यासाठी अनेक स्तनदा माता समोर आल्या आहेत

amravati
बाळाच्या मदतीसाठी सरसावलेल्या माता
author img

By

Published : Sep 4, 2021, 3:57 AM IST

Updated : Sep 4, 2021, 10:38 AM IST

अमरावती - डॉक्टरांनी दिलेल्या तारखेपूर्वीच जन्माला आलेल्या जुळ्या नवजात बाळांना येथील होप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. एक मुलगा आणि एक मुलगी असणाऱ्या या दोन जुळ्या चिमुकल्यांना आईच्या दुधाची गरज भासली असताना ही गरज भागवण्यासाठी अनेक स्तनदा माता समोर आल्या आहेत. रक्तदान चळवळीत अव्वल असणारे अमरावती शहर यानिमित्ताने आता दूध दान चळवळीच्या दिशेनेही वाटचाल करायला लागले आहे.

दूध दान चळवळ: 'त्या' जुळ्या बाळांना दूध पाजण्यासाठी सरसावल्या स्तनदा माता

आईचा जीव कासावीस, वडिलांची होत होती धावपळ -

अमरावती शहरातील होप हॉस्पिटलमध्ये 13 दिवसांपूर्वी एका मातेने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. डॉक्टरांनी दिलेल्या तारखेपूर्वी जन्म घेणाऱ्या दोन चिमुकल्यांना दाखल करण्यात आले. वेळेपूर्वीच जन्म घेणाऱ्या जुळ्या बाळांसाठी आईकडे दूध नसल्यामुळे सुरुवातीला दोन-तीन दिवस येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील मिल्क बँक तसेच एका खासगी रुग्णालयातील मिल्क बँकमधून दुधाची व्यवस्था करण्यात आली. मात्र, या दोन्ही ठिकाणी दुधाचा तुटवडा असल्यामुळे या बाळांना पावडरचे दुध देण्यात आले. पावडरचे दुध या बाळांसाठी उपयुक्त नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात येताच स्तनदा मातेचे दूध बाळांना द्या, असा सल्ला डॉक्टरांनी बाळांच्या वडिलांना दिला. आपल्या बाळांना दूध उपलब्ध नसल्याने आईचा जीव कासावीस होत होता. तर बाळांसाठी दूध मिळवण्यात वडिलांची धावपळ सुरु होती. होप रुग्णालयात फार्मसीस्ट असणाऱ्या भारती मोहकार यांनी बाळाच्या वडिलांची अडचण जाणून घेतली. त्यांनी बाळांना दूध द्यावे, यासाठी स्तनदामातांनी समोर यावे, अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे यांनी ही पोस्ट वाजताच रुग्णालयात धाव घेतली आणि या जुळ्या बाळांसाठी दूध देणाऱ्या त्या पहिल्या स्तनदा माता ठरल्या.

हेही वाचा - विदेशी तंत्रज्ञानाचा वापर, अमरावतीमध्ये साकारले विदर्भातले एकमेव प्री-फॅब्र कोविड रुग्णालय

13 स्तनदा मातांनी केले दूध दान -

होप रुग्णालयात दाखल दोन जुळ्या बाळांना दूधदान करण्यासंदर्भात भारती मोहकार यांनी सोशल मीडियावर आवाहन करताच सर्वात आधी सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे यांनी या दोन्ही बाळांना आपले दूध दान केले. रक्ताप्रमाणेच दुधाची गरज ही अतिशय महत्त्वाची असल्याने यापुढे अमरावती शहरात रक्तदान चळवळी सोबतच दुधदान चळवळही उभारावी, असा निश्चय भारती मोकार आणि गुंजन गोळे या दोघींनी केला. या दोघींनी स्तनदा मातांना बाळांसाठी दूध देण्याबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता दोन दिवसांत तेरा माता या बाळांना दूध देण्यासाठी समोर आल्या. अमरावती शहरासह लगतच्या वर्धा जिल्ह्यातूनही या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे सहायक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या अपुर्वा काटपवार यांनी अमरावतीत येऊन या बाळांसाठी आपले दूध दान केले. आपल्या दुधामुळे दुसऱ्याच्या बाळाचे प्राण वाचवले जात असल्याचा आनंद वाटत असल्याचे अपुर्वा काटपवार 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाल्या.

स्तनदा मातांमध्ये होत आहे जागृती -

अनेकदा बाळांना आईच्या दुधाची गरज भासते. ज्या मतांकडे आपल्या बाळांसाठी दूध उपलब्ध नाही, अशा बाळांना इतर स्तनदा मातांचे दूध अतिशय महत्त्वाचे ठरते. यामुळेच गुंजन गोळे आणि भारती मोहकार यांनी एक पाऊल पुढे टाकत गरजू नवजात बालकांसाठी दूध दान करण्याबाबत जागृती करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी असणाऱ्या मिल्क बँकमध्ये दूध मिळावे, यासाठी अवघ्या दोन दिवसांत 25 स्तनदा माता समोर आल्या असल्याची माहिती गुंजन गोळे आणि भारती मोहकार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

हेही वाचा - पत्ता विचारण्यासाठी 'पाच' रुपये, अन् पुढच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी द्यावे लागतात दहा रुपये

Last Updated : Sep 4, 2021, 10:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.