अमरावती - मी अंजनगावला माझी बहीण व पत्नीसह देवदर्शनासाठी आलो होतो. चौकात काही लोकांनी भ्याड हल्ला केला. यांना शिवसैनीक म्हणता येत नाही. शिवसैनीक छातीवरती वार करतो. त्यांना माझे आव्हान आहे, कधी दिवशी यायचे आणि कुठे यायचे हे सांगा, मी कोणत्याही चौकात उभा राहतो असे आवाहन आमदार संतोष बांगर यांनी या हल्ला करणाऱ्यांना दिले आहे.
अमरावती जिल्ह्यातील अंजमगाव सुर्जी येथे जितेंद्रनाथ महाराजांच्या मठात आमदार बांगर हे पत्नी आणि बहिणीसोबत आले होते. दरम्यान, त्यांच्या वाहनावर शिबसैनिकांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.