अमरावती - शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली असताना आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला भाजपच्या युतीतून बाहेर काढून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महायुती केली. या सर्वांमागे संजय राऊत हेच कारणीभूत असून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊत यांनी फायनान्शिअल डील केली असल्याचा खळबळजनक आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.
अनेक घोटाळे येथील समोर - ईडी कडून वर्षभरापासून संजय राऊत यांची चौकशी सुरू होती. संजय राऊत यांचे अनेकदा ईडीने नोंदविले आहे. अखेर त्यांना रविवारी रात्री अटक करण्यात आली. त्यांच्या या अटकेमुळे आता अनेक घोटाळे समोर येणार आहेत. संजय राऊत यांच्या सोबत असणारे अनेकांचे धागेदोरे आता समोर येणार आहेत. संजय राऊत यांच्या ज्या काही कंपन्या आहेत. त्या कंपन्यांमधील घोटाळ्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. अनेक बिल्डरला त्यांनी पोहोचविलेला फायद्याची सुद्धा चौकशी होईल, अलिबाग मधली त्यांची प्रॉपर्टी, पत्राचाळमध्ये असलेली इन्वेस्टमेंट आणि मुंबईमध्ये असलेले मोठ्या प्रमाणात त्यांनी घेऊन ठेवलेले फ्लॅट, अशा अनेक कंपन्यांसोबत त्यांचे धागे मिळणार आहेत, असे देखील आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या युतीबाबतही करावी चौकशी - भाजपपासून दूर केल्यावर शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीसाठी युती करताना संजय राऊत यांना नेमका किती लाभ झाला आहे. याची देखील ईडीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे. येणाऱ्या काळात अनिल परब यांना देखील अटक होईल, असे देखील आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांना न्यायालयात करण्यात येणार हजर - पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणी सेना नेते खासदर संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या 10 अधिकाऱ्यांनी नऊ तास चौकशी केली. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात सांयकाळी नेले. तेथेही तब्बल सहा तास चौकशी केल्यावर रात्री उशिरा 12 वाजून 30 मिनिटांनी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली. ही अटक 31 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्री झाली.
आज सकाळी 9:30 वाजता खासदार संजय राऊत ( Sanjay Raut medical check up ) यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची ( Sanjay Raut PMLA court ) सूत्रांनी माहिती दिली आहे. संजय राऊत यांच्या कोठडीची मागणी ईडीकडून न्यायालयात केली जाण्याची शक्यता आहे.
रविवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत घरी चौकशी- पत्राचाळ घोट्याप्रकरणी काल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत ( Sunil Raut on Sanjay Raut arrest by ED ) यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. रविवारी सकाळी 7 ते सध्याकाळी 4 पर्यंत संजय राऊत यांची त्यांच्या घरी चौकशी ( Sanjay Raut arrest by ED ) झाल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. तेथे चौकशी नंतर त्यांना ईडीने ( Patra chawl scam and sanjay raut ) अटक केल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली. भाजप संजय राऊत यांना घाबरत असून म्हणून त्यांची अटक करण्यात आल्याचे सुनील राऊत म्हणाले. तसेच, आज न्यायालयासमोर संजय राऊत यांना हजर करण्यात ( ED action on sanjay raut regarding patra chawl scam ) येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
घरातून 11 लाख 50 हजार रुपये जप्त-खासदार संजय राऊत यांची चौकशीनंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात नेण्यात आले. या दरम्यान ईडीला या प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे मिळाली नाहीत अशी माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली आहे. त्यानंतर आता जी ताजी माहिती येते त्यानुसार खासदार संजय राऊत यांच्या घरातून 11 लाख 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळं या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे? - पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता. म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला 414 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी म्हाडावर जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर त्यास जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. एका महिन्याच्या नोटिशीची मुदत संपल्यावर विकासकाची उचलबांगडी करण्यात आली. मात्र विकासकाला पुनर्वसनातील सदनिका बांधण्याआधीच विक्रीची परवानगी देणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर काहीही कारवाई केली नाही. मात्र त्याचा फटका सामान्य रहिवाशांना बसला आहे. गेली पाच वर्षे भाडे नाही आणि हक्काचे घरही गमावावे लागले आहे.
हेही वाचा -Nana Patole Criticized BJP : 'भाजपने सांगावे मलईदार खाते कोणते' ?- नाना पटोले यांची भाजपवर टीका
हेही वाचा - Sanjay Raut Arrest : संजय राऊत यांना आज सकाळी साडेअकरा वाजता पीएमएलए न्यायालयात करण्यात येणार हजर