ETV Bharat / city

MLA Bachchu Kadu: बच्चू कडू नेहमीच राहिले आहेत वादग्रस्त.. यापूर्वीही अनेकांना केली आहे मारहाण.. पहा प्रकरणे.. - अनेकांना मारहाण करणारे बच्चू कडू वादग्रस्तच

MLA Bachchu Kadu मंत्रालयातील उपसचिव असो, परतवाडा शहरातील वाहतूक पोलीस Traffic Police तसेच विविध विभागातील अधिकारी आणि अनेक सर्वसामान्य व्यक्तींना संतापाच्या भरात मारहाण करणारे अचलपूरचे आमदार बच्चू कडू MLA Bachu Kadu हे आपल्या अशा वागणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात वादग्रस्त आहेत. एका आंदोलना प्रकरणात गिरगाव दंडाधिकारी कोर्टाने बच्चू कडू यांना सुनावलेल्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने Mumbai Sessions Court नुकताच दिलासा दिला

Bachchu Kadu
Bachchu Kadu
author img

By

Published : Sep 28, 2022, 4:38 PM IST

अमरावती मंत्रालयातील उपसचिव असो, परतवाडा शहरातील वाहतूक पोलीस Traffic Police तसेच विविध विभागातील अधिकारी आणि अनेक सर्वसामान्य व्यक्तींना संतापाच्या भरात मारहाण करणारे अचलपूरचे आमदार बच्चू कडू MLA Bachu Kadu हे आपल्या अशा वागणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात वादग्रस्त आहेत. एका आंदोलना प्रकरणात गिरगाव दंडाधिकारी कोर्टाने बच्चू कडू यांना सुनावलेल्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने Mumbai Sessions Court नुकताच दिलासा दिला आहे. आज बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यात गणोजा येथे आपल्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

4 वर्षांपूर्वी वाहतूक पोलिसाला मारहाण परतवाडा येथील मध्यवर्ती बस स्थानकासमोर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसाला अतिशय शुल्लक कारणावरून चार वर्षांपूर्वी बच्चू कडू यांनी मारहाण केली होती. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका आढावा बैठकीत बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्याला चक्क प्लास्टिकची बॉटल फेकून मारल्यामुळे खळबळ उडाली होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यावर भिरकावली फाईल अपंग बांधवांच्या अडचणी संदर्भात बच्चू कडू यांनी नाशिक येथे अपंग कल्याण विभागात अपंगांना मदत व्हावी. याबाबत प्रशासनाकडून गांभीर्याने काम होत नसल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी चक्क अपंग कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फाईल भिरकावली Filed on senior officials होती. भुसावळ येथे सात ते आठ महिन्यापूर्वी राज्यमंत्री म्हणून एका बैठकीच्या दरम्यान वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला बच्चू कडू यांनी मारहाण केल्यामुळे खळबळ उडाली होती.

मंत्रालयात उपसचिवांना केली मारहाण मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना 30 मार्च 2022 रोजी बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली होती. या प्रकरणात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी बच्चू कडू यांना अटक केली असताना न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.