अमरावती - शहराजवळील श्री क्षेत्र रेवसा येथे श्री ब्रम्हचारी महाराजांची मागील दीडशे वर्षांपासून मोठी यात्रा भरते. यावर्षी ब्रह्मचारी महाराजांचा १५१ वा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे. या सोहळ्यात अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
हेही वाचा... प्रभू श्रीरामाची कृपा..! मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा करणार अयोध्या वारी
जवळपास ७५ वर्षांपूर्वीपर्यंत येथे भाविक यात्रेला यायचे आणि ठिकठिकाणी चुल पेटवून स्वयंपाक करायचे. मात्र, याच सर्व भाविकांना एकत्र करून संत गाडगेबाबानी त्यांना सर्वांचा स्वयंपाक एकत्र करायला सांगितले होते. तेव्हापासून येथे महापंगतीची एक आगळीवेगळी प्रथा सुरू झाली आहे.
हेही वाचा... राज ठाकरेंनी झेंड्याचा रंगच नाही तर, मनही बदलावे - रामदास आठवले
अमरावतीच्या ब्रह्मचारी महाराज संस्थानचे रेवसा येथे ब्रह्मचारी महाराजांचे समाधी मंदिर आहे. महाराजांनी याच ठिकाणी समाधी घेतली होती. यावर्षी महाराजांचा १५१ वा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे. या अंतर्गत अनेक धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या महोत्सवानिमित्त येथे दरवर्षी यात्राही भरत असते. या यात्रेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. यावर्षी सुद्धा हजारो भाविकांनी या महापंगतीत बसून महाप्रसादाचा लाभ घेतला.