ETV Bharat / city

Melghat Water Crisis : मेळघाटात बादलीभर पाण्यासाठी त्राहीत्राही, 1500 गावकरी 2 टँँकर पाण्यावर!

author img

By

Published : Jun 10, 2022, 12:50 PM IST

Updated : Jun 10, 2022, 2:15 PM IST

Melghat Water Crisis : मेळघाटातील खडियाल गावातील लोक एक बादली पाण्यासाठी जीव धोक्यात घालत ( bucket of water ) आहेत. "गावात फक्त दोनच विहिरी आहेत ज्या जवळपास कोरड्या पडल्या आहेत, 1500 लोकसंख्येचे गाव दररोज पाण्यासाठी 2-3 टँकरवर अवलंबून आहे", एका गावकऱ्याने सांगितले.

Melghat Water Crisis
मेळघाटात बादलीभर पाण्यासाठी त्राहीत्राही

Melghat Water Crisis : अमरावती - मेळघाटातील खडियाल गावातील लोक एक बादली पाण्यासाठी जीव धोक्यात घालत ( bucket of water ) आहेत. "गावात फक्त दोनच विहिरी आहेत. ज्या जवळपास कोरड्या पडल्या आहेत, 1500 लोकसंख्येचे गाव दररोज पाण्यासाठी 2-3 टँकरवर अवलंबून आहे", अशी भीषण परीस्थिती असताना नेते, प्रशासन नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अक्षम ठरले आहे, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे. कोरड्या विहिरीत पाणी टाकून दोन टँकरने गावाला पाणीपुरवठा केला जातो. विहिरीतून पाणी काढण्यासाठी लोक जीव धोक्यात घालतात. घाणेरडे पाणी प्यायल्याने आजार वाढत आहेत. एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी रस्ता नाही. ," असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

विहिरीतल्या डबक्यातुन पिणासाठी पाणी : अनेक दिवसांपासून गावात मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाई आहे. गावात प्रशासनाच्या वतीने दिवसाला दोन ते तीन टँकर दिले जातात. ते पाणी विहिरीत टाकले जाते. विहिरीत असलेल्या डबक्यातून मिळेल ते पाणी घरगुती वापरासाठी व पिण्यासाठी वापरले जाते. यातून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई परसत आहे. मात्र त्यांना लोकांना रुग्णालयात नेण्यासाठीही रस्ता नाही अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे.

जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई : मेळघाटात डिसेंबर जानेवारी महिन्यापासूनच अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होते. खडियाल येथे जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 1500 लोकसंख्या असणाऱ्या या गावात आता उन्हाळ्यात तर गावकऱ्यांना पाण्यासाठी अतिशय कष्ट घ्यावे लागत आहेत. गावात दोन विहिरी असून या दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यात प्रशासन टँकरने पाणी आणून टाकते. यातून येणाऱ्या गढूळ पाण्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

  • "Water is supplied to the village through two tankers that pour water into dry wells. People risk their lives to draw water from wells. Diseases are increasing after drinking dirty water. If a person gets sick, there is no road to take them to the hospital," said another villager pic.twitter.com/sPOVHjcB4u

    — ANI (@ANI) June 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ग्रामस्थ दिवसभर भरतात पाणी : गावातील ग्रामस्थ मिळेल तेव्हा पाणी भरण्यासाठी दिवस भर प्रयत्न करतात. प्रशासनाचे टँकर विहिरीवर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी भरण्यासाठी गर्दी होते. यावेळी बादलीभर पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. दिवसरात्र येथील नागरिक सध्या विहिरीवर फेऱ्या मारत असतात. असेही येथील नागरिकांनी सांगतिले आहे.

हेही वाचा - Drought In Melghat : मेळघाटात दुष्काळाच्या झळा.. राणीगावात कोरड्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी कसरत

Last Updated : Jun 10, 2022, 2:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.