अमरावती - जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सात दिवसांसाठी अमरावती शहर, अचलपूर शहर व अन्य नऊ गावात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा आदेश दिला होता. परंतु रुग्णसंख्येत घट होत नसून सातत्याने वाढ होत असल्याने आता लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन ८ मार्चपर्यंत करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. तसेच अंजनगाव सुर्जी शहरात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथे देखील लॉकडाऊन होणार आहे.
एसटीची सेवाही बंद! परंतु...
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये एसटीची सेवाही बंद आहे. परंतु जे लोक चुकून अमरावतीमध्ये येतात त्या लोकांना गावापर्यंत सोडून देण्याचे काम एसटी महामंडळ सध्या करत आहे. एकीकडे आधीच तोट्यात असलेली एसटी लॉकडाऊन मध्ये सुद्धा तोट्यात चालली आहे. मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून वरुड मोर्शीसह इतर तालुक्यापर्यंत एसटी प्रवाशांना गावापर्यंत पोहचवून देण्याचे काम करत आहे.
अमरावती जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णसंख्येची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सात दिवसांचा लॉकडाऊन लावला आहे. ८ मार्चला हा लॉकडाऊन संपणार आहे.
हेही वाचा- रुग्णसंख्या कमी होत नसल्याने अमरावतीमधील लॉकडाऊन आठ दिवसांनी वाढवला