अमरावती: अचलपूर मतदारसंघात पंधरा वर्षापासून सुरू असलेलेली राज्यमंत्री बच्चू कडू यांची राहूटी आता कर्तव्य यात्रा झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून लाखो लोकांचे कामे मार्गी लागत आहेत. त्यांनी या यात्रेची व्याप्ती वाढवली आहे. मेळघाटचे स्थानिक आमदार राजकुमार पटेल यांच्या पुढाकाराने आता मेळघाटातही ही यात्रा सुरू झाली आहे. कायम मागासलेला भाग असलेल्या या भागातील आदिवासी बांधवांना आजही सरकारी योजनांची माहिती होत नाही. छोट्या छोट्या कामासाठी त्यांना वारंवार सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र कडू व पटेल यांच्या उपस्थितीत दोन दिवसात जवळपास अडीच हजार गरजू कुटूंबाना स्वस्त धान्याचे रेशन कार्ड तात्काळ वितरीत करण्यात सोबत प्रलंबित कामाचाही निपटारा करण्यात येत आहे.
Bacchu Kadu on Melghat Visit : अंध-अपंग दाम्पत्याला न्याय, रेशन कार्ड साठीची तीन वर्षाची वणवन तीन तासांत थांबवी
सामान्य नागरिकांला (Common People)आपल्त्याा हक्कासाठी कायम सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. ज्या रेशन कार्डला(Ration card) दोन तीन महिन्यांचा अवधी लागतो. तिथे मात्र मेळघाट (Melghat) मधील बिहाली गावातील भोला मावस्कर या अंध व्यक्तीला व त्याच्या अपंग पत्नीला तीन वर्षे तहसील कार्यालयाचे उंबरठे झीजहुनही रेशन कार्ड मिळत नव्हते. मात्र मेळघाटात सुरू असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू (State Minister Bachchu Kadu) यांच्या कर्तव्य यात्रेत तीन तासातच या दाम्पत्याला हक्काचे रेशन कार्ड मिळाले आहे.