अमरावती हृदयविकाराचा झटका आल्यामुळे हृदयाच्या पडद्याला छिद्र पडले अशा अवस्थेत रुग्ण महिलेला योग्य उपचारासाठी अमरावतीतून थेट नागपूरला पाठवणे गरजेचे होते मात्र आम्हाला नागपूरला जायचे नाही तुमच्याकडे उपचार घ्यायचा आहे अशी ठाम भूमिका रुग्ण महिलेच्या Manda Haribhau Pandey नातेवाईकांनी घेतली अशा परिस्थितीत हृदयावर किचकट अशी शस्त्रक्रिया केली तर रुग्ण वाचेलच याची शाश्वती नसताना डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारले शस्त्रक्रिया केल्यावर आठ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्ण महिला रुग्णालयातच दाखल होती आठ दिवसांनंतर रुग्ण महिला हसत खेळत घरी जाण्याच्या तयारीत असल्याचे पाहून तिला जीवनदान मिळाल्याचा आनंद व्यक्त करीत तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्याही जीवात जीव आला अमरावती शहरात हृदयाची Axon Private Hospital in Amravati अशी किचकट शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वी झालेल्या डॉक्टरांचा आनंद गगनाला भिडणारा आहे
हृदयविकाराचा झटका आला आणि सुरू झाली धावपळ अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात असणाऱ्या शिरजगाव बंड Shirajgaon Bund या गावातील रहिवासी असणाऱ्या मंदा हरिभाऊ पांडे Manda Haribhau Pandey या साठ वर्षीय महिलेला दहा दिवसांपूर्वी अचानक अस्वस्थ वाटायला लागले अंगावर मुंग्या आल्या असाव्यात असा भास व्हायला लागला त्यांना तत्काळ चांदूरबाजार येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून रुग्ण महिलेला अमरावतीला हलविण्याचा सल्ला कुटुंबीयांना दिला यानंतर वेळ वाया न जाऊ देता पांडे कुटुंबीयांनी मंदा पांडे यांना अमरावती शहरातील अॅक्झॉन या खासगी Axon Private Hospital in Amravati रुग्णालयात आणले
हृदयविकाराचा तीव्र झटका या ठिकाणी डॉ सुधीर धांडे यांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली असता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी त्यांना नागपूरला जाण्याचा सल्ला दिला मात्र पांडे कुटुंबीयांनी आता कुठलीही धावपळ न करता तुम्हीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करा आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे अशी भूमिका घेतली आणि यानंतर डॉक्टरांनी अतिशय किचकट असणारी ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच अमरावतीत करण्याची तयारी दर्शवली
डॉक्टरांसमोर असे होते आव्हान डॉक्टरांनी मंदा पांडे ह्या रुग्ण महिलेची तपासणी केली असता हृदयविकाराच्या झटक्यामुळे हृदयाच्या दोन कप्प्यांमध्ये असणाऱ्या पडद्याला छिद्र पडल्याचे आढळून आले या परिस्थितीत रुग्णाच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली तर तो रुग्ण एक-दोन दिवसांच्या वर वाचेल याची शाश्वतीच नसते तसेच या रुग्णाच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली नाही तर तो महिनाभरात दगावतो अशीच परिस्थिती असते यामुळे आमच्यासाठी मंदा पांडे या रुग्ण महिलेवर शस्त्रक्रिया करणे मोठे आव्हान होते असे डॉ सुधीर धांडे ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले
आता अमरावतीतदेखील अशी किचकट शस्त्रक्रिया शक्य आम्ही हे आव्हान स्वीकारले आणि सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर हृदयावरील ही अतिशय किचकट शस्त्रक्रिया आम्ही यशस्वीपणे पूर्ण केली शस्त्रक्रिया केल्यावर रुग्णाला 24 तास आमच्या पथकाच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले आता शस्त्रक्रिया झाल्यावर आठ दिवस पूर्ण झाले असून मंदा पांडे यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असल्यामुळे आता अमरावतीतदेखील अशी किचकट शस्त्रक्रिया सहज शक्य असल्याचे डॉ. सुधीर धांडे म्हणाले विशेष म्हणजे नागपूरला या शस्त्रक्रियेसाठी आठ ते दहा लाख रुपये खर्च येतो आमच्या रुग्णालयात मात्र आम्ही चार लाख रुपयांमध्ये ही शस्त्रक्रिया केली असून रुग्णाच्या नातेवाईकांना ही रक्कम टप्प्याटप्प्याने दिली तरी आम्हाला हरकत नाही असे सांगितले असल्याचे डॉ सुधीर धांडे यांनी सांगितले
अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये जाण्याचा दिला होता सल्ला अमरावती शहरात अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल येथे अशी शस्त्रक्रिया अगदी मोफत झाली असती मी स्वतः गत चार वर्षांपासून अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल येथे रुग्णांवर उपचार करतो आहे पांडे कुटुंबीयांना अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला आम्ही दिला होता मात्र आम्हाला आता कुठेही जायचे नाही अशी भूमिका पांडे कुटुंबीयांनी घेतली असेदेखील डॉ सुधीर धांडे म्हणाले 2018 पासून आतापर्यंत मी सोळाशेच्या वर हृदयांवर शस्त्रक्रिया केल्या असल्यामुळे मंदा पांडे यांच्या हृदयावर किचकट शस्त्रक्रिया आपण यशस्वीपणे करू शकतो असा विश्वास असल्यामुळेदेखील आम्ही हे आव्हान स्वीकारले असेदेखील डॉ सुधीर धांडे यांनी स्पष्ट केले
मंदा पांडेंच्या चेहऱ्यावर हास्य कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तीन दिवस नेमके काय होत आहे हे कळतच नव्हते अंगाला मुंग्या आल्या असाव्यात असे जाणवत होते रात्रीदेखील झोप येत नव्हती अशी अवस्था मंदा पांडे यांची झाली होती कुटुंबीयांनी जे काही होईल ते सारे ईश्वरावर सोडले होते मात्र मंदा पांडेंच्या हृदयावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली मंदा पांडे या गृहिणी असून, त्यांचे पती हरिभाऊ पांडे हे शिरजगाव बंड येथे शेती करतात त्यांचा मुलगा राहुल हादेखील शेतकरी आहे दीपाली पुंड आणि प्रांजली खवले अशा दोन मुली त्यांना असून त्यांच्या या संकट काळात सर्वच रुग्णालयात त्यांच्याजवळ हजर होते आता मंदा पांडे यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असताना त्यांना जीवनदान मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे
हेही वाचा Indias First Microfactory आयआयटी बॉम्बेमध्ये देशातील पहिला सूक्ष्म कारखाना सुरू