ETV Bharat / city

Hanuman Temple Land Theft : हनुमान मंदिराची जमीन गेली चोरीला; अमरावतीतील धक्कादायक प्रकार

author img

By

Published : May 18, 2022, 3:14 PM IST

अमरावती शहरातील रामनगर परिसरात ( Amravati Hanuman Temple Land Scam ) असणाऱ्या हनुमान मंदिराची जमीन चोरीला ( Hanuman Temple Land Theft ) गेली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Hanuman Temple Land Theft
Hanuman Temple Land Theft

अमरावती - अमरावती शहरातील रामनगर परिसरात ( Amravati Hanuman Temple Land Scam ) असणाऱ्या हनुमान मंदिराची जमीन चोरीला ( Hanuman Temple Land Theft ) गेली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या जागेवर मंदिर आहे, ती संपूर्ण जागाच बेपत्ता झाली असून मंदिराची जमीन चोरीला गेली असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनासह मंत्रालयापर्यंत गेली आहे.

प्रतिक्रिया

काय आहे प्रकरण - अमरावती शहरातील मौजा शेगाव येथील सर्वे नंबर 57/2 मध्ये असणाऱ्या गोविंदराव सरनाईक यांच्या 37 हजार स्क्वेअर फूट शेतात 100 वर्ष जुने हनुमान मंदिर आहे. गोविंदराव सरनाईक यांनी 7 एप्रिल 1983 रोजी त्यांच्या 37 हजार स्क्वेअर फूट पैकी दोन एकर जमीन ही रमेश मालूसह दोघांना विकली होती. त्याच दिवशी म्हणजे 7 एप्रिल 1983 रोजी ज्यांनी ही जमीन खरेदी केली, त्यांनी जेठीबाई छांगानी नामक व्यक्तीला ही जमीन विकली. गोविंदराव सरनाईक यांच्या निधनानंतर या जमिनीचा भूमिअभिलेख विभागाने चुकीचा नकाशा दिल्यावर केवळ 3700 स्क्वेअर फूट जमीन सोडून उर्वरित जमिनीवर अमरावती महापालिकेने लेआउट मंजूर केले. यामुळे 1960 पासून श्री हनुमान या नावाने असणारा येथील हनुमान मंदिराचा सातबारावरील 3700 स्क्वेअर फुट जागा गहाळ झाली.

जमिनीचा अद्यापही शोध नाही - ज्यांना जमीन विकली त्या बिल्डरने सरनाईक यांनी पूर्वी विकलेल्या दोन एकर जागेसह उर्वरित सर्वच सर्वात जागेवर हक्क सांगून कुंपण घातले. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर सरनाईक कुटुंबाच्यावतीने सचिन देशमुख या व्यक्तीने यासंदर्भात मंत्रालयात 2016 मध्ये मंत्रालयात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले. न्यायालयाने या जागेवर बांधकाम करणाऱ्या संबंधित बिल्डरना बांधकाम करा, मात्र निकाल लागेपर्यंत झालेले बांधकाम कोणालाही विकू नका, असे आदेश दिले आहे. महापालिकेलाही हा घोळ कसा काय केला या संदर्भात शासनाकडून विचारण्यात आली आहे. मात्र, याबाबत कुठलेही स्पष्टीकरण महापालिकेच्यावतीने देण्यात आले नसल्यामुळे या जागेवर बांधकाम करणारे बांधकाम व्यावसायिकही अडचणीत सापडले आहेत. या संपूर्ण गोंधळात हनुमान मंदिराच्या जमिनीचा अद्यापही शोध लागला नसल्याचे सचिन देशमुख यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.ल

शासनाने दखल घ्यावी - हा सर्व प्रकार आता सर्वांसमक्ष असून भुमिअभिलेख आणि महापालिकेने केलेल्या चुकीच्या कामामुळे हनुमान मंदिराची जमीन हरवून गेली आहे. शासनाने याप्रकरणाची दखल घेऊन मंदिराची जागा शोधून द्यावी आणि हा गुंतलेला तिडा सोडवून प्रत्येकाला योग्य न्याय द्यावा, अशी मागणी देखील सचिन देशमुख यांनी केली आहे.

हेही वाचा- Hardik Patel resigns : काँग्रेसचे नेते हार्दिक पटेलांचा राजीनामा.. भाजपात जाण्याची शक्यता?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.