अमरावती चिखलदरा तालुक्यातील कोटमी गावातील अंबिका गोंडू मरस्कोल्हे वय 19 वर्षे या मुलीचा मृतदेह त्यांच्याच शेताच्या विहिरात आढळल्यामुळे Aadivas girl death body in well मेळघाटात Melghat Aadivasi girl death खळबळ उडाली आहे. माझ्या मुलीची आत्महत्या नसून तिचा खून Melghat Girl murder करण्यात आल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
असा लागला शोध अंबिकाचा शोध अंबिका ही बुधवारी अचानक दुपारी 3 वाजता घरातून गायब झाली होती. कुटुंबातील लोकांनी तिचा सगळीकडे शोध घेतला. तरी ती आढळून आली नाही. शेताची राखण करण्यासाठी अंबिकाचे मोठे वडील शेतात गेले असता 19 ऑगस्टला रात्री 8 च्या सुमारास त्यांना शेताच्या विहिरीत अंबिकाचे शव तरंगत असल्याचे दिसल्याने त्यांना धक्काच बसला. गावातील पोलीस पाटील पंचम कंगाले यांनी तात्काळ काटकुंभ पोलीस चौकी येथे फोन करून पोलिसांना पाचारण केले. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास शव बाहेर काढून पंचनाम्यानंतर उत्तरीय तपासणीकरिता चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
माझ्या मुलीची आत्महत्या नसून खून परतवाडा येथील मुलगा जाकीर उर्फ शाहरुख अंबिकाला सतत त्रास देत होता. अंबिका गायब झाली त्या दिवशीही तो मुलगा गावातीलच अमोल उईके याच्या घरी मुक्कामी होता. घटनेनंतर ते दोघेही गायब असल्याची माहिती गावकऱ्यानी दिली आहे. आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मृत अंबिकाच्या वडिलांनी केला आहे. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणी रहस्य उलगडणार आहे. अंबिका हत्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे काटकुंभ पोलीस चौकी येथील जमादार विलास आवारे पाटील, रुपेश शिंगण, पो कॉं. पवन सातपुते करत आहे.