अमरावती - मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी शाडू मातीने घडवलेल्या गणपती मूर्तीच्या विक्री केंद्राचे आज जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उद्घाटन केले. तुरुंगातील ८ कैद्यांनी या मूर्ती घडवल्या आहेत.
कारागृहात शिक्षा भोगत असताना ८ कैद्यांनी ३ महिन्यात शाडू मातीच्या ५०० मूर्ती घडवल्या. कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनात या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या मूर्ती आज कारागृहाच्या वस्तू निर्मिती व विक्री केंद्रात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. यावेळी कारागृहातील मूर्ती पाहून जिल्हाधिकारी अवाक झाले. अमरावतीकरांनी कारागृहाच्या गणपती विक्री केंद्रातून गणपती मूर्ती घ्याव्या. मातीच्याच गणपतीची स्थापना करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.