ETV Bharat / city

विनापरवानगी साखरपुडा; अमरावतीच्या कांचन रिसॉर्टवर गुन्हा दाखल

शहरातील कांचन रिसॉर्ट येथे दुपारी 12 च्या सुमारास विनापरवानगी व सुमारे 50 व्यक्तींच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ होत असल्याचे तहसीलदार पथकाच्या निदर्शनास आले. त्यानुसार रिसॉर्टचे मालक व वर-वधू यांच्याविरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

lockdown rules in amravati
कांचन रिसॉर्ट
author img

By

Published : Jun 4, 2021, 10:57 AM IST

अमरावती - शहरातील नवसारी रिंगरोडवरील कांचन रिसॉर्ट येथे विनापरवानगी साखरपुडा समारंभ आयोजित केल्याचे निदर्शनास आल्यावरुन गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृह विलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांविरुद्धही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पथकाद्वारे नियमित कारवाई होत असून, जिल्ह्यात काल दोन बेशिस्तांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

फौजदारी दाखल करण्याचे आदेश -

कोविड- 19 साथीमुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू असून, सार्वजनिक समारंभावर मर्यादा घालण्यात आली आहे. त्याचे पालन न केल्यास कारवाईची तरतूदही आदेशात करण्यात आली आहे. साथीचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा भंग होता कामा नये, अन्यथा दंडात्मक कारवाईबरोबरच फौजदारी दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

नियम मोडल्याने कारवाई -

शहरातील कांचन रिसॉर्ट येथे दुपारी 12 च्या सुमारास विनापरवानगी व सुमारे 50 व्यक्तींच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ होत असल्याचे तहसीलदार पथकाच्या निदर्शनास आले. त्यानुसार रिसॉर्टचे मालक व वर-वधू यांच्याविरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार संतोष काकडे यांच्या निर्देशानुसार नवसारी मंडळ अधिकारी बी. जी. गावनेर व तलाठी जितेंद्र लांडगे यांनी तक्रार दिली. त्यानुसार गाडगेनगर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 188, 269, 270, 271, 291, साथ रोग अधिनियमाचे कलम 2, 3 व 4, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे कलम 51 (ब) अन्वये गुन्हा दाखल केला.

अंजनगाव सुर्जीतही कारवाई -

अंजनगाव सुर्जी नगरपरिषद क्षेत्रातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्यामुळे गृह विलगीकरणात राहण्याबाबत कळविण्यात आले होते व परवानगी देताना तसे हमीपत्रही लिहून घेण्यात आले होते. मात्र, गृह विलगीकरणाच्या काळात ही व्यक्ती रस्त्यावर फिरताना आढळल्याने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांच्या पथकाने या व्यक्तीविरुद्ध कारवाई केली. त्यांच्या तक्रारीनुसार अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अभिजित जगताप यांनी दिली.

गृहविलगिकरणाचा नियम मोडला-

महापालिका पथकांकडूनही गृह विलगीकरणातील व्यक्तींशी नियमित संपर्क ठेवला जातो. त्यांच्याकडून हमीपत्रही लिहून घेतले जाते. मात्र, गृह विलगीकरणात असलेल्या शंकरनगरातील एका व्यक्तीच्या घरी भेट दिली असता ही व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळली. त्यानुसार पालिकेचे डॉ. सचिन बोंद्रे यांच्या पथकाने कारवाई केली व याबाबत राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.