ETV Bharat / city

नापिकी-कर्जबाजारीपणाला कंटाळून तिवस्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

रात्री ११ च्या सुमारास गावातील तिवसा पोलीस ठाण्याजवळ असलेल्या विहिरीत यावले यांनी उडी घेतली. शेखर विठोबाजी यावले, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

author img

By

Published : May 17, 2019, 6:11 PM IST

Updated : May 18, 2019, 12:11 AM IST

शेखर विठोबाजी यावले

अमरावती - तिवसा येथे एका ४३ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेखर विठोबाजी यावले, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

तिवसा येथे विहीरीत उडी घेवून शेतकऱ्याची आत्महत्या

शेखर विठोबाजी यावले यांच्याकडे ६ एकर शेती आहे. शेतीवर अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ४० ते ५० हजार रुपयांचे कर्ज आहे. शेतीची सर्व कामे ही शेखर यावले करत होते. त्यांनी सोयाबीन, तूर आणि कपाशीचे पीक घेतले होते. मात्र, शेतीच्या उत्पनामध्ये सतत नापिकी, योग्य भाव त्यांना मिळत नव्हता. त्यांच्याकडे शेतीची मशागत आणि पेरणीसाठीही पैसे उरले नव्हते. ते अजूनही अविवाहित होते. कित्येक वर्षापासून त्यांचे लग्नही जुळत नव्हते.

रात्री ११ च्या सुमारास गावातील तिवसा पोलीस ठाण्याजवळ असलेल्या विहिरीत यावले यांनी उडी घेतली. सकाळी एक महिला विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता पाण्यामध्ये त्यांना मृतदेह दिसला. ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी तिवसा ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आला आहे.

Intro:43वर्षीय शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या. अमरावतीच्या तिवसा येथील घटना.

अमरावती अँकर

सततची नापिकी, कर्जबाजारी व योग भाव न मिळत नसल्यामुळे संकटात सापडलेला शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे सत्र थांबता थांबत नाही आपल्या प्रश्नांचा गुंता सोडविण्यासाठी विष प्राशन, गळफास,व विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करू लागला आहे. शेतकरी आत्महत्यांमागे सतत नापिकी,बँकेचं कर्ज शेतमालाला मिळणारे अत्यल्प भाव हे कारण असल्यामुळे सर्व सामान्य शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
अशीच एक घटना घडली अमरावतीच्या तिवसा येथे ,एका 43वर्षीय शेतकऱ्यांने रात्री 11च्या सुमारास गावातील तिवसा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं समजतं, एक महिला सकाळी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता पाण्यामध्ये तरंगत असेलल्या मृत्यू अवस्थेमध्ये दिसून आले तेव्हा ही घटना वाऱ्या सारखी गावामध्ये पसरली व नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली शेखर विठोबाजी यावले वय 43. रा. प्रभाग क्रमांक 8 तिवसा सततच्या नापीकिमुळे व समोरच्या शेतीची मशागत व पेरणीसाठी पैसे नसल्यामुळे निराश होऊन आत्महत्या केल्याचं समजतं आहे.शेखर विठोबाजी यावले यांच्याकडे सहा एकर शेत जमीन आहे व या शेतीवर अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचं चाळीस ते पन्नास हजार रुपयाचे कर्ज आहे,शेतीची सर्व कामे ही शेखर यावले करीत होते त्यामध्ये ते सोयाबीन, तूर, कपाशीचे पीक ते घेत होते मात्र शेतीच्या उत्पनामध्ये सतत नापिकी,योग भावा न मिळत असल्याने त्याचप्रमाणे लग्नही जुळत नसल्यामुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. पोलीसांनी घटना स्थळी पंचनामा करून शवविच्छदनासाठी तिवसा ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : May 18, 2019, 12:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.