ETV Bharat / city

अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद मात्र रस्त्यावर गर्दी कायम

जिल्हा प्रशासनाने औषधी, फळ, भाज्या, बेकरी तसेच हॉटेल व्यवसायास विकेंडमध्येही सुरू ठेवण्याची परवानगी दिली असल्याने ही सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असल्याने बंदचा विशेष असा परिणाम दिसत नाही.

अमरावती विकेंड लॉकडाऊन
अमरावती विकेंड लॉकडाऊन
author img

By

Published : Jul 3, 2021, 5:54 PM IST

Updated : Jul 3, 2021, 5:59 PM IST

अमरावती - कोरोना आणि डेल्टा प्लसला रोखण्यासाठी अमरावती जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशानुसार शहरातील बाजारपेठ बंद असली तरी रस्त्यावर मात्र अमरावतीकरांची गर्दी कायम आहे.

अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू

जिल्हा प्रशासनाने औषधी, फळ, भाज्या, बेकरी तसेच हॉटेल व्यवसायास विकेंडमध्येही सुरू ठेवण्याची परवानगी दिली असल्याने ही सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असल्याने बंदचा विशेष असा परिणाम दिसत नाही. शहरातील जयस्तंभ चौक ते सरोज चौक तसेच नमुना परिसरातील कापड मार्केट बंद आहे. या भागात कपड्यांव्यतिरिक्त इतर दुकाने बंद आहेत. बाजारपेठ बंद असली तरी रस्त्यांवर नागरिकांची गर्दी मात्र आहे.

इतवारा बाजार सुरू

शहरातील सर्वात मोठा भाजी बाजार असणारा इतवारा बाजार विकेंडमध्येही सुरू आहे. या बाजारात नेहेमीप्रमाणेच गर्दी होती. यासह कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही सकाळी गर्दी होती.

अनेक भागात दुकाने उघडली

शहरातील विविध भागात सकाळच्या वेळेस सर्वच प्रकारची दुकाने उघडली होती. सकळी 7 ते 9 वाजेपर्यंत काही दुकानदारांनी आपला होईल तो व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला.

जिल्ह्यात 362 कोरोना रुग्ण

जिल्ह्यात सद्यघाडीक 362 अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. शुक्रवारी 39 नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आलेत. कोरोनामुळे जिल्ह्यात 1 हजार 554 जणांचा मृत्यू झाला आहे.

Last Updated : Jul 3, 2021, 5:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.