अमरावती - भारत देशाची सेवा करत सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना सेवानिवृत्तीनंतरसुद्धा कमी दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात याकरिता जिल्ह्यात आर्मी कॅन्टीनची निर्मिती करण्यात आली. मात्र, या कॅन्टीन प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात माजी सैनिकांचा रोष उफाळून आला. सीमेवर लढणाऱ्या या माजी सैनिकांचा सलग दोन-अडीच तास प्रशासनासोबत वाद उफाळून आला.
हेही वाचा - वृक्षप्रेमींनी केली वृक्षावर शस्त्रक्रिया; बुडापासून तोडलेले झाड पुन्हा केले उभे
शहरातील कॅम्प रोड परिसरातील आर्मी कॅन्टीन राष्ट्रीय कॅडेट कोर्स कंपनी तीन महाराष्ट्र यांच्या निगराणीत चालवण्यात येते. मात्र, मागील तीन महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी ही आर्मी कॅन्टीन बंद होती. 3 जून रोजी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानंतर कॅन्टीन सुरू करण्यात आली. मात्र, नेहमीप्रमाणेच कॅन्टीन प्रशासनाची मुजोरी माजी सैनिकांच्या रोषाचे कारण ठरली. कॅन्टीन सुरू करण्यापूर्वी कॅन्टीन प्रशासनाने कुठलेही नियोजन केले नाही. पहाटेपासून रांगेत असलेल्या सैनिकांनासुद्धा जीवनावश्यक वस्तू वेळेवर मिळणे दुरापास्त झाले आहे.
जीवनावश्यक वस्तू वेळेवर मिळत नसल्याने माजी सैनिकांचा रोष उफाळून आला. संतप्त माजी सैनिकांना शांत करण्यासाठी बहादूर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रॉय यांनीसुद्धा सैनिकांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र सुमारे दीड तास तोडगा न निघाल्याने कलह सुरू होता. कॅन्टीन प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे आम्हाला बेशिस्त वागण्यास भाग पाडल्याची खंत काही माजी सैनिकांनी बोलून दाखवली.
हेही वाचा - अमरावतीच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना कार्यकाळात मुदतवाढ मिळाल्याने जल्लोष, मात्र कोरोना नियमांचा विसर