ETV Bharat / city

कोरोना आणि महागाईला कंटाळून जीवन संपवू नका - यशोमती ठाकूर

तिवसा तालुक्यातील छिदवाडी येथील सेजल जाधव या 17 वर्षीय विद्यार्थिनीने कुटुंबावरील कर्ज, नापिकी, हलाखीची परिस्थिती यामुळे तणावात येऊन आत्महत्या केली. यशोमती ठाकूर यांनी सेजलच्या भाऊ- बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली, आणि 10 हजार रूपयांची आर्थिक मदतही दिली.

YASHOMATI THAKUR
यशोमती ठाकूर
author img

By

Published : Oct 23, 2021, 7:55 PM IST

अमरावती - कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीने छिदवाडी येथील सेजल जाधव या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. लेकीच्या अशा अचानक निघून जाण्याने उध्वस्त झालेल्या जाधव कुटुंबाला महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आधार दिला. श्रीमती ठाकूर यांनी सेजलच्या भाऊ-बहिणीला शिक्षणासाठी दत्तक घेतले असून, जाधव कुटुंबाला तातडीची आर्थिक मदतही केली आहे.

कोरोना आणि महागाईला कंटाळून जीवन संपवू नका
तिवसा तालुक्यातील छिदवाडी येथील सेजल जाधव या 17 वर्षीय विद्यार्थिनीने कुटुंबावरील कर्ज, नापिकी, हलाखीची परिस्थिती यामुळे तणावात येऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत कळताच मंत्री श्रीमती ठाकूर हेलावून गेल्या. त्यांनी तातडीने तत्काळ जाधव कुटुंबाची भेट घेतली. तसेच सेजलच्या भाऊ- बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. कुटुंबाला 10 हजार रूपयांची तत्काळ आर्थिक मदतही दिली. सेजलच्या भावंडांच्या शिक्षणाच्या जबाबदारीसह तिच्या बहिणीच्या विवाहाची जबाबदारी मंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वीकारली आहे. युवकांना कळकळीचे आवाहन एखाद्या विद्यार्थ्याने असा विचार करावा व स्वत:चे जीवन संपवावे. ही अत्यंत सुन्न करून टाकणारी ही घटना आहे. ही वेदना शब्दांत मांडता येत नाही. आत्महत्येसारखे घातक पाऊल कुणीही उचलू नये. आत्महत्या हा इलाज नाही. संकट आले तर हार मानू नका. एकदा का जीव गेला तर तो पुन्हा येणार नाही. विद्यार्थी व तरूणांनी डिप्रेशनमध्ये येऊ नये. हिंमत ठेवावी, असे कळकळीचे आवाहन महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी केले.

प्रशासनलाही दिले आदेश
जाधव कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आपण त्यांच्या पाठीशी राहू. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासनाच्या वतीने मदत मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. अशा घटना घडू नयेत म्हणून प्रभावी व सातत्यपूर्ण समुपदेशन यंत्रणा उभारण्यासाठीही प्रयत्न करू. या अनुषंगाने प्रशासनानेही आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा - देशात कोरोनाने मृत्यूतांडव केलेले असताना भाजपकडून सेलिब्रेशन यापेक्षा दुर्दैव कोणतंच नाही - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.