ETV Bharat / city

Climate Change : ऐन हिवाळ्यातच हरवली थंडी, 1 ते 3 डिसेंबर दरम्यान विदर्भात पावसाची शक्यता

सध्या हिवाळा सुरू (Winter Season) झाला आहे. मात्र, विदर्भात (Vidarbha) अजूनही पाऊस येत असल्यामुळे येथील थंडी गायब झाली आहे. विदर्भातून थंडी गायब झाल्यामुळे येथील स्वेटर, जॅकेटचे व्यवसाय थंड पडले आहेत. तसेच 1 ते 3 डिसेंबर दरम्यान विदर्भात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

winter in Vidarbha
हिवाळ्यात थंडी गायब
author img

By

Published : Nov 27, 2021, 3:24 PM IST

Updated : Nov 27, 2021, 3:37 PM IST

अमरावती - यावर्षी पावसाळा संपत असताना पाऊस कोसळला तसा हिवाळ्याचे दोन महिने उलटून गेल्यावरही थंडीचा (Winter Season) अद्याप विदर्भात (Vidarbha) पत्ता नाही. नोव्हेंबर महिन्यात कुडकुडणाऱ्या विदर्भात भर हिवाळ्यात थंडीच हरवली असल्याचे वातावरण सध्या अनुभवयास येत आहे.

अमरावतीमधून प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
  • यामुळे झाले थंडीचे प्रमाण कमी-

अग्नेय बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत असून, विदर्भात ईशान्य दिशेकडून बाष्पयुक्त वारे येत असल्याने विदर्भात थंडीचे प्रमाण कमी असल्याचे श्री. शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान शास्त्र विभागाचे प्राध्यापक अनिल बंड यांनी 'ई टीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.

  • विदर्भात पावसाचा अंदाज-

29 नोव्हेंबर रोजी दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, 1 आणि 2 डिसेंबरला कमी दाबाचे क्षेत्र डिप्रेशनच्या स्वरूपात मध्यवर्ती बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे 1 ते 3 डिसेंबर दरम्यान विदर्भात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम विदर्भात हा पाऊस कोसळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम पावसाची शक्‍यता असल्याचेही हवामान तज्ज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी व्यक्त केली.

  • पहाटे फिरणाऱ्यांची गर्दी कायम-

अमरावती शहरातील विविध भागात पहाटे फिरणाऱ्यांची गर्दी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात थंडी पडल्यावर मंदावते. आता नोव्हेंबर महिना संपत आला असतानाही थंडी जाणवत नसल्यामुळे पहाटे फिरणाऱ्यांची गर्दी उन्हाळ्यात असते तशीच कायम आहे.

  • गरम कपडे विकणार्‍यांचा व्यवसाय थंड-

हिवाळा लागला की शहराच्या विविध भागात उलनचे स्वेटर, टोपी, मफलर विकणार्‍यांची गर्दी पाहायला मिळते. स्वेटर विकण्यासाठी येणारे नेपाळी लोकंही मोठ्या प्रमाणात हिवाळ्यात शहरात येतात. यावर्षी मात्र नेपाळी व्यावसायिक शहरात गरम कपडे विकण्यासाठी आलेच नाहीत. स्थानिक व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेला स्वेटर, टोपी, जॅकेटचे दुकाने थाटली आहेत. त्यांच्या दुकानांकडेही कोणी फिरकत नाही अशी अवस्था आहे.

Last Updated : Nov 27, 2021, 3:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.