अमरावती: जिल्ह्यातील प्रत्येक गरीब कुटुंबात दिवाळी उत्साहात साजरी व्हावी या उद्देशाने खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही एक लाख कुटुंबांमध्ये किराण्याचे वितरण केले जाणार आहे. उद्यापासून अमरावती शहरासह जिल्ह्यातील विविध भागात गरिबांच्या घरी युवा स्वाभिमान पार्टीचे (Yuva Swabhiman Party) कार्यकर्ते हा किराणा पोहोचवणार आहेत.
नवनीत राणांनी भरल्या किराणाच्या पिशव्या: आमदार रवी राणा यांच्या गोदामात सध्या किराणाच्या पिशव्या भरण्याचे काम सुरू आहे. कार्यकर्त्यांसह स्वतः खासदार नवनीत राणा यांनी देखील अनेक पिशव्यांमध्ये स्वतःच्या हाताने किराणा भरला. 200 च्या वर कार्यकर्ते किराणा वितरणासाठी सज्ज झाले आहेत. राणा दाम्पत्याच्या वतीने एक लाख गरीब कुटुंबांना साखर, तेल, चणाडाळ, पोहे, मैदा, मुरमुरे, रवा, सोयाबीन वडी, डालडा, मसाले, शेंगदाणे आणि मिठाचा इत्यादी किराणा मालाचे वितरण केले जाणार आहे.