ETV Bharat / city

नवनीत राणा : वलयांकीत खासदार, चर्चा आणि वाद! - शिवसेना

माध्यमांत कायम चर्चेत असणाऱ्या नवनीत राणा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने वादात सापडल्या आहेत. याशिवाय शिवसेनेसोबतच्या वादामुळेही त्या यापूर्वी चर्चेत आल्या होत्या. संसदेत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी धमकाविल्याचा आरोप राणा यांनी केला होता. यानंतर शिवसेना आणि राणा यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झडल्या होत्या.

नवनीत राणा : वलयांकीत खासदार, चर्चा आणि वाद!

author img

By

Published : Jun 9, 2021, 4:05 PM IST

Updated : Jun 10, 2021, 3:13 PM IST

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे राणा यांनी म्हटले आहे, तसेच शिवसेनेसोबत सुमारे दहा वर्षांपासून आपला संघर्ष असल्याचे राणा यांचे म्हणणे आहे. जात प्रमाणपत्राचा मुद्दा नवीन असला तरी याशिवायही राणा माध्यमांत कायम चर्चेत असतात. संसदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी काही वेळेस केंद्र सरकारवर तर काही वेळेस राज्य सरकारवरही टीका केली आहे.

नवनीत राणा : वलयांकीत खासदार, चर्चा आणि वाद!

संसदेत अरविंद सावंतांनी धमकाविल्याचा आरोप

मार्च महिन्यात पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान राणांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यावेळीही त्यांचा शिवसेनेसोबतचा वाद ठळकपणे समोर आला होता. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांचा मुद्दा संसदेत उपस्थित करताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप राणांनी केला होता. याविषयी एक पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं होतं. अरविंद सावंतांनी मात्र हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले होते. राणा यांचा शिवसेनेवर राग आहे म्हणून त्या असा आरोप करत आहेत असे सावंत त्यावेळी म्हणाले होते.

navneet rana
नवनीत राणा यांचा संग्रहित फोटो

बाळासाहेब गेले आणि शिवसेनेत महिलांचा आदर संपला

यानंतरही संसदेत राणांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंत शिवसेनेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जिवंत होते. परंतु बाळासाहेब ठाकरे गेले आणि शिवसेनेत महिलांचा आदर संपला, अशी टीका राणा यांनी या घटनेनंतर लोकसभेत बोलताना केली होती.

जात प्रमाणपत्राचा वाद

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे स्वीय सचिव सुनील भालेराव यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत 2014 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीत राणांचा पराभव झाला होता. मात्र जात वैधतेचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. 2019 मध्ये याच जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा यांनी निवडणूक लढविली आणि त्या विजयीही झाल्या. मात्र आता उच्च न्यायालयाने हे प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची खासदारकी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे राणा यांनी स्पष्ट केले आहे.

पेन्शनच्या मुद्द्यावरून केंद्रावर टीका

सप्टेंबर 2020 मध्ये पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशादरम्यान बोलताना राणा यांनी पेन्शनधारकांचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी केंद्रावर त्यांनी निशाणा साधला होता. अनेक पेन्शनधारकांना १०० ते ५०० रुपये महिना पेन्शन मिळते. ही पेन्शन तुटपुंजी असून कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार ती ७ ते ८ हजार रुपये असणे गरजेचे आहे. सरकारकडे इपीएफ-९५ खाताधारकांचे ५ लाख कोटी जमा आहेत. असे असतानाही इतकी कमी पेन्शन कर्मचाऱ्यांना का दिली जात आहे असा थेट सवाल त्यांनी केंद्राला विचारला होता.

navneet rana
नवनीत राणा यांचा संग्रहित फोटो

विना मास्क, विना हेल्मेट बुलेट स्वारीवरून टीका

गत फेब्रुवारी महिन्यात नवनीत राणा यांनी पती रवी राणा यांच्यासोबत अमरावती शहरातून बुलेटवरून मारलेला फेरफटका चांगला चर्चेत आला होता. यावेळी राणा दाम्पत्याने मास्क परिधान केलेला नव्हता, तसेच हेल्मेटही परिधान केलेले नव्हते. यावरून राणा दाम्पत्यावर चांगलीच टीका झाली होती. याशिवाय लोकसभा निवडणुकीतील विजयानंतरही राणा दाम्पत्याच्या दुचाकीवरील स्वारीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

सावित्रीबाई फुलेंना भारतरत्नची मागणी

नोव्हेंबर 2019 मध्ये पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान बोलताना राणा यांनी सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्यात यावा. तसेच पुण्यातील भिडेवाडा येथील पहिल्या महिला शाळेची दुरवस्था झाली असून तिचे नुतनीकरण करण्यात यावे. या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.

आदीवासींसोबत विशेष बंध

राणा यांचा मतदारसंघ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील आदीवासी बांधवांमध्ये त्या अत्यंत सहजतेने मिसळताना दिसता. आदीवासी बांधवांच्या विविध सांस्कृतिक समारंभांमध्ये सहभागी झाल्यानंतर तेथील पारंपरिक लोकनृत्यांतही राणा दाम्पत्य सहभागी झाल्याचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

Last Updated : Jun 10, 2021, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.