अमरावती - अमरावती जिल्ह्यातील मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. आदिवासींच्या मागणीसंदर्भात निवेदन देणाऱ्या तरुणांना आमदार पटेल यांनी जणू धमकीच दिली आहे. राजकुमार पटेल यांच्यासमोर नंदुरबारमधील काही आदिवासी तरूण हे सरकारने कसे आदिवासी लोकांचे नुकसान केले. बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या जागा बळकावल्या आहेत. तसेच मेळघाटमधील तरुणांना त्यांच्या शिक्षणाचा काहीच फायदा झाला नाही. असे हे तरुण आमदार पटेल यांच्या समोर सांगत असतानाच पटेल यांनी या तरुणांना जास्त बोलू नका, निवेदन द्या आणि निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र निवेदन देण्यासाठी आलेल्या आदिवासी तरुणांसोबत आमदाराचा झालेल्या वादाचा विडिओ व्हायरल होत आहे.
निवेदन देण्यासाठी आलेले तरूण आणि आमदार पटेल यांच्यामध्ये बाचाबाची
आदिवासींच्या प्रश्नांना घेऊन काही नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी तरुण हे आमदार राजकुमार पटेल यांना निवेदन देण्यासाठी आले होते. यावेळी निवेदन देताना या तरुणांनी आमदार पटेल यांच्यासमोर आदिवासी तरुणांना कसे नागवल्या जाते. त्यांच्या नावावर दुसरे लोक कसा गैरफायदा घेतात याची व्यथा मांडली. सोबतच तुमच्या मतदारसंघामधील आदिवासी तरुणांनाही काही शिक्षणाचा फायदा झाला नाही. असेही या तरुणांनी आमदार पटेल यांच्यासमोर सांगताच राजकुमार पटेल यांचा पारा चढला आणि निवेदन देण्यासाठी आलेले तरूण आणि राजकुमार पटेल यांच्यामध्ये प्रचंड बाचाबाची झाली.
'मग त्यांची आरती करू का..'
माझ्या मेळघाटमधील कुठलेही आदिवासी आले तर त्यांच्या समस्या जाणून घेईल. परंतु हे नंदुरबारवरून येऊन माझ्यासमोरच मला उलटसुलट बोलत होते. त्यामुळे मी त्यांचे सहन करू का, अन् त्यांची आरती करु का, अशी प्रतिक्रिया आमदार राजकुमार पटेल यांनी दिली. दरम्यान नंदुरबारवरून आलेल्या या तरुणांनी रेस्ट हाऊसमध्ये जाऊन माझ्याविरोधात काही व्हिडिओ बनवले असल्याची माहिती देखील आमदार राजकुमार पटेल यांनी दिली. त्याबद्दल पोलिसात तक्रार सुद्धा केली असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
हेही वाचा - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील भीषण अपघाताचा थरारक VIDEO, दोन ट्रकमध्ये कारचा झाला चुराडा