ETV Bharat / city

'अमरावती जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा' - shivsena

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे बबलू देशमुख यांची निवड. तर उपाध्यक्ष पदी शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.

Amravati Zilla Parishad election
अमरावती जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा
author img

By

Published : Jan 6, 2020, 6:59 PM IST

अमरावती - जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तर शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहे. अमरावती जिल्हा परिषदेत अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती.

अमरावती जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा

हेही वाचा... जेएनयू हिंसाचार : 24 तासांच्या आत आरोपींना अटक करा - पी. चिदंबरम

राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी असल्याने अमरावती जिल्हा परिषदेत देखील पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 25 सदस्य आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, शिवसेनेचे 3, भाजपचे 13 प्रहार संघटनेचे 5, लढा संघटनेचा 1, अपक्ष 1 आणि युवा स्वाभिमान संघटनेचे 2 सदस्य आहेत.

हेही वाचा... जेएनयुतील घटनेमुळे देशाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह - सुप्रिया सुळे

या निवडणुकीत आपण काँग्रेसला धक्का देऊ शकतो का? याची चाचपणी भाजपने निवडणुक जाहीर होताच केली. मात्र जिंकण्याची शक्यता नाही, हे लक्षात येताच भाजपने निवडणुकीतून अंग काढून घेतले. दरम्यान अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे बबलू देशमुख आणि उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण या दोघांचे अर्ज होते. सोमवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांनी निकाल जाहीर केला. यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे बबलू देशमुख आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

हेही वाचा... नाशिक : तीनच दिवसात सोने ३,२०० रुपयांनी महाग

निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बसपा, प्रहारच्या सदस्यांनी ढोल-ताशे वाजवून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि शिवसेनेच्या प्रीती बंड यांनी जिल्हा परिषदेत पोहोचून बबलू देशमुख आणि विठ्ठल चव्हाण यांचे अभिनंदन केले.

Intro:अमरावती जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा महा विकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक अविरोध झाली असून काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तर शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण हे उपाध्यक्ष म्हणून अविरोध निवडून आले आहे.

Body:अमरावती जिल्हा परिषदेत अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. आता महाराष्ट्रातही काँग्रेस आणि शिवसेनेची महा विकास आघाडी असताना अमरावती जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला.
अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 25 सदस्य आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2शिवसेनेचे 3 भाजपचे 13 प्रहारचे 5 , लढा संघटनेचा 1, अपक्ष1 आणि युवा स्वाभिमान संघटनेचे 2 सदस्य आहेत. या निवडणुकीत आपण काँग्रेसला धक्का देऊ शकतो का याची चाचपणी भाजपने निवडणुक जाहीर होताच सुरुवातीला केली. मात्र या निवडणुकीत आपले काही खरे नाही हे लक्षात येताच भाजपने या निवडणुकीतून अंग काढून घेतले. दरम्यान अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे बबलू देशमुख आणि उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण या दोघांचे अर्ज होते. आज दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे बबलू देशमुख आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
अमरावती जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा हा विकास आघाडीचा झेंडा फडकला ने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना बसपा प्रहार च्या सदस्यांनी ढोल-ताशे वाजवून आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर महिला व बालकल्याणमंत्री यशोमती माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि शिवसेनेच्या प्रीती बंड यांनी जिल्हा परिषदेत पोहोचून बबलू देशमुख आणि विठ्ठल चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. आता भाविकास आघाडीचा झंजावात सर्वत्र दिसणार असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या. त्याला अडीच वर्षाच्या काळात भाजपची सत्ता असल्याने आम्हाला काही अडचणी आल्या मात्र आता महाराष्ट्रात महा विकास आघाडीचे सरकार असल्याने अमरावती जिल्ह्यात झपाट्याने विकास होईल असे जिल्हा परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष बबलू देशमुख म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.