अमरावती - संपूर्ण शहरात जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्ड्यातून वाट काढताना वृद्ध, बालके तसेच इतरही वाहनधारकांचे छोटे मोठे अपघात झाल्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात शहरात घडल्या आहेत. या सर्व घटना पाहून येथील काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. येथे युवक काँग्रेसने डफली बजाव आंदोलन केले आहे.
युवक काँग्रेसचा प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टिमेटम - शहराच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असल्याने नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी युवक काँग्रेसने काल रस्त्यांवरील खड्ड्यांसमोर ढोल ताशे वाजून भजन कीर्तन केले. खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आठ दिवसात जर शहरातील खड्डे बुजवण्यात आले नाहीत. तर, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.
आंदोलन करत भजनही केले - अमरावती शहरात ठीक-ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत, त्यामुळे रोज अपघाताची संख्या वाढली आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहन त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे अमरावतीत काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. अमरावतीच्या काँग्रेसच्या वतीने खड्ड्या समोर डफली बजाव आंदोलन करत भजनही केले आहे. त्यामुळे तातडीने रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
नागरिकांना खड्डांमुळे त्रास - माजी महापौर विलास इंगोले, कालीमाता मंदिराचे शक्ती महाराज, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, युवक काँग्रेसचे राजा बागडे, समीर जवंजाळ यांच्या नेतृत्वात प्रशासनाला निवेदन देण्यात आली. यावेळी विलास इंगोले यांनी सांगितले की, सणासुदीला नागरिकांना खड्डांमुळे त्रास झाल्यास किंवा मोठी दुर्घटना झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असही काँग्रेस म्हणाले आहे.
हेही वाचा - Rahul Gandhi Detained : राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात