अमरावती : अमरावती-जबलपूर रेल्वे ही मागील 5 वर्षांपासून चालू ( Congress Agitation For Start Amravati Jabalpur Railway ) होती. मात्र, अचानकपणे ही रेल्वे आता बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याने काँग्रेसच्या वतीने अमरावती रेल्वे स्टेशनवर आंदोलन करण्यात आले. यावेळी चक्क रेल्वे स्टेशनवर हनुमानजींच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करून ( Protest was Held at Amravati Railway Station ) करण्यात आले.
खा. राणा, खा. बोंडे यांचा केला निषेध : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व खासदार अनिल बोंडे यांचा निषेध करण्यात आला. हे दोन्ही खासदार हिंदुत्वाच्या नावावर अमरावती समाजामध्ये तेढ निर्माण करतात. विकासकामे व इतर समस्यांबाबत बोलत नाही, असा आरोप काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील देशमुख यांनी केला. दरम्यान, काँग्रेसने आक्रमक होत अमरावती-जबलपूर रेल्वे सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
खा. नवनीत राणांचे यापूर्वी याकामाकरिता रेल्वेमंत्र्यांना घातले होते साकडे : कोरोना काळात बंद करण्यात आलेली अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२१५९) ही पूर्ववत करून प्रवाशांना दिलासा द्यावा, किंबहुना ही गाड़ी अकोली रेल्वे स्थानकाहून सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन खासदार नवनीत राणा यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना गुरुवारी दिले आहे.
अमरावती जिल्ह्यातील प्रवाशांवर अन्याय : नागपूर-जबलपूर यादरम्यान ही गाडी निरंतर सुरू आहे. तथापि, अमरावती-जबलपूर अशी ही गाडी सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली असताना, ही बाब अमरावती जिल्ह्यातील प्रवाशांवर अन्याय करणारी आहे. रेल्वे प्रशासनाच्या अशा अफलातून कारभारामुळे चुकीच्या प्रथा, परंपरांना जन्म दिला जात आहे.
प्रवाशांची कैफियत नवनीत राणा यांनी मांडली होती : यामुळे यामध्ये प्रवाशांची असलेली कैफियत खासदार नवनीत राणा यांनी पत्राद्वारे मांडली आहे. अमरावती-जबलपूर या दरम्यान प्रवासी वर्ग मोठा आहे. त्यामुळे मंजूर झाल्याप्रमाणे अमरावती-जबलपूर ही गाडी पूर्ववत करावी, नवीन अकोली रेल्वे स्थानकाहून ती सुरू करावी, अशी मागणी खा. राणा यांनी केली.