ETV Bharat / city

Amravati Contaminated Water Case : मेळघाटात दूषित पाण्यामुळे चौघांचा मृत्यू; मुख्यमंत्री सहायता निधीतून वीस लाखांची मदत - मेळघाट दूषित पाणी पिल्याने नागरिकांची प्रकृती खालावली

मेळघाटातील पाच डोंगरी गावात दूषित पाणी पिल्याने अनेकांना कॉलराची लागण ( Amravati Contaminated Water Case ) झाली. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या चार जणांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 20 लाखांची मदत केली ( CM Eknath Shinde Announced To Provide Rs 20 Lakh ) होती.

MP Nanvneet Rana
MP Nanvneet Rana
author img

By

Published : Jul 10, 2022, 3:10 PM IST

अमरावती - अमरावती जिल्ह्यात मेघाटातील पाच डोंगरी गावात दूषित पाणी पिल्यामुळे चार जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला ( Amravati Contaminated Water Case ) आहे. तसेच, एकूण 100 च्या वरती नागरिकांना कॉलराची लागण झाली. चार जणांचा मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये प्रमाणे एकूण वीस लाख रुपयांची मदत पाठवली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून आलेल्या या रकमेचा धनादेश खासदार नवनीत राणा यांनी चिखलदराचे प्रभारी तहसीलदार राजगडे यांना आज सुपूर्द केला ( CM Eknath Shinde Announced To Provide Rs 20 Lakh ) आहे.

खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

खासदार नवनीत राणांनी मानले आभार - मेळाघाटातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तात्काळ दखल घेतली. त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत केली. याबाबत खासदार नवनीत राणांनी ( MP Nanvneet Rana ) मुख्यमंत्री शिंदे आभार व्यक्त केले आहे. दहा वर्षात पहिल्यांदाच मेळघाटीतल समस्येची इतक्या तातडीने दखल घेण्यात आली असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

चार जणांचा झाला मृत्यू - मेघाटातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या पाच डोंगरी आणि कोयलारी येथे दूषित पाण्यामुळे कॉलरा सारख्या आजारामुळे 100 च्यावरती नागरिक आजारी पडली. पाचडोंगरी येथील रहिवासी साबुलाल जामुनकर (76) सविता अखंडे (26), गंगाराम अधिकार (25 )आणि मुनिया उईके (65) या चार जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या ह्या चारही जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.

पिण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर - मेळघाटात दिवसेंदिवस पाणी टंचाईची परिस्थिती भीषण होत चालली आहे. मेळघाट, चिखलधरा जवळ असलेल्या गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पण, लोकप्रतिनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांना पिण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर करावा लागत आहे. गढूळ पाणी पिल्याने गावात अनेकांना खोकला, पोट दुखी सारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

खासदार, आमदारांचे दुर्लक्ष - हनुमान चालीवरुन चर्चेत आलेल्या खासदार नवनीत राणा यांच्याकडून या गंभार समस्येकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे नवनीत राणांना केवळ निवडणुकीच्या वेळीच मेळघाटाची आठवण येते का?, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. राणा यांच्यासोबत जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनीही पाणी समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आलं आहे.

हेही वाचा - Amravati Chemist Murder Case : कोल्हेंच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.