ETV Bharat / city

नवनीत राणांच्या जीवाला धोका, केंद्र सरकारने पुरवली वाय प्लस सुरक्षा - नवनीत राणा शिवसेना वाद

नवीत राणांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्र्यांना दिला. त्यावरुन खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या सुरक्षा व्यवस्थेत एसपीओ, एनएसजीचे कमांडो, सीआयएसएफचे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा पुरविण्यात येणार आहे.

Mp Navneet Rana
खासदार नवनीत राणा
author img

By

Published : Apr 14, 2022, 7:41 AM IST

अमरावती - आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्या भोंगळ कारभारावरुन चांगलीच टीका केली आहे. त्यामुळे नवनीत राणांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्र्यांना दिला. त्यावरुन खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.

अशी असणार सुरक्षा व्यवस्था - केंद्र सरकारने प्रदान केलेल्या या सुरक्षा व्यवस्थेत एसपीओ, एनएसजीचे कमांडो, सीआयएसएफचे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा पुरविण्यात येणार असून 24 तास हे सुरक्षा पथक खासदार नवनीत राणा यांच्या समवेत राहणार आहे.

जीवाला धोका असल्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेनेचा अहवाल - खासदार नवनीत राणा या सातत्याने लोकसभेत महाविकास आघाडीच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढतात, देशातील अनेक गंभीर प्रश्नांना वाचा फोडतात, सोबतच अनेक ज्वलंत मुद्द्यांना हात घालतात, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्रालयाला दिला होता. त्याची गांभीर्याने दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार नवनीत रवी राणा यांच्या सुरक्षेसाठी ही वाय प्लस सुरक्षा यंत्रणा प्रदान करण्याचे निर्देश दिल्याचे खासदार नवनीत राणा यांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.