ETV Bharat / city

अमरावतीत मालटेकडीजवळ कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; कारचालक जखमी - car accident Amravati

अमरावती येथील बस स्थानक मार्गावरून नागपूरकडे जात असताना मालटेकडीजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या आवारात कोसळली.

car accident amravati
कार अपघात
author img

By

Published : Mar 20, 2020, 4:01 PM IST

अमरावती - शहरातील मध्यवर्ती बस स्थानकसमोरून भरधाव वेगात येणारी कार मालटेकडी लगत महाराष्ट्र गृहनिर्माण कार्यालयाच्या आवारात कोसळली. या विचित्र अपघातात कारचालक जखमी झाला आहे. राकेश पांडे असे अपघातातील जखमी कार चालकाचे नाव आहे.

अमरावतीत मालटेकडीजवळ कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

हेही वाचा... बीएस-४ वाहनांच्या विक्रीला मुदतवाढ द्या; हिरो मोटोकॉर्पची सर्वोच्च न्यायालयात याचिका

राकेश पांडे हे नागपूर येथील रहिवासी असून ते आज (शुक्रवार) सकाळी अकोल्यावरून अमरावतीला आले होते. अमरावती येथील बस स्थानक मार्गावरून नागपूरकडे जात असताना मालटेकडीजवळ त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यापासून बऱ्याच अंतरावर असणाऱ्या खोलगट भागात कोसळली. मध्यभागी झाड आडवे आल्यामुळे ही गाडी झाडाला अडकली.

कार ज्या ठिकाणी जाऊन कोसळली, तो भाग महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या आवाराची जागा आहे. मुख्य रस्त्यापासून महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या आवाराची जागा आणि मुख्य रस्त्याचे अंतर पाहता भरधाव वेगात येणारी कार, इतकी खाली कशी काय पोहोचली याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी कारचालक राकेश पांडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.