ETV Bharat / city

अमरावतीतील निलंबित पोलीस कर्मचाऱ्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोहीम

author img

By

Published : Aug 5, 2021, 12:25 PM IST

अमरावतीच्या चांदुर बाजार पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी महेश काळे यांनी तीन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी हातात बंदुक सदृश्य वस्तू घेत अंगात वर्दी घातली होती. दरम्यान, हा व्हिडिओ रुबाबदार असल्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, गैरवर्तणूक, बेजबाबदारपणा ठपका ठेवून या पोलीस कर्मचाऱ्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. हे निलंबन मागे घ्यावे यासाठी नेटकऱ्यांनी सोशलमीडियावर मोहीम सुरू केली आहे.

#we support mahesh kale
अमरावतीत गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

अमरावती - 'जिल्ह्यामध्ये पाय ठेवताना दादागिरी आणि भाईगिरी लांबच ठेऊन यायचं भाऊ.. अमरावतीमध्ये जो कायद्यात राहणार तोच फायद्यात राहणार.. कारण कस आहे ना. कायद्याचा बालेकिल्ला ओन्ली अमरावती जिल्हा' असा एक व्हिडिओ अमरावतीच्या चांदुर बाजार पोलीस स्टेशनचे कर्मचारी महेश काळे यांनी तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ चित्रपटातील एखाद्या सिनला ही लाजवेल असा असल्याने काही तासातच तो तुफान व्हायरल झाला. परंतु, हा व्हिडिओ तयार करताना या कर्मचाऱ्याच्या अंगात खाकी वर्दी व बंदूक सदृश्य शस्त्र असल्याने त्याच्यावर गैरवर्तणूक, बेजबाबदारपणा व वर्दीचा गैरवापर याचा ठपका ठेऊन त्याला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांनी निलंबित केले आहे. हे निलंबन मागे घ्यावे यासाठी नेटकऱ्यांनी सोशलमीडियावर पोलीस कर्मचारी महेश काळे यांच्या समर्थनार्थ मोहीम सुरू केली आहे.

निलंबन मागे घेण्याची नेटकऱ्यांची मागणी -

पोलीस कर्मचाऱ्याने व्हिडिओमध्ये गैर काहीच नसून हा व्हिडिओ कायद्याचेच समर्थन करणारा व गुन्हेगारांना चाप देणारा असल्याचे सांगत नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोलीस कर्मचारी महेश काळे यांच्या समर्थनार्थ मोहीम चालू केली आहे. या कर्मचाऱ्याचे निलंबन मागे घेण्याची मागणीही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केली आहे. #we support mahesh kale, #we support amravati police असा हॅशटॅग ही वापरण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये काहीच गैर नाही नेटकऱ्यांचे म्हणणे -

अमरावतीच्या चांदुर बाजार पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी महेश काळे यांनी तीन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी हातात बंदुक सदृश्य वस्तू व अंगात वर्दी घातली होती. दरम्यान, हा व्हिडिओ रुबाबदार असल्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, गैरवर्तणूक, बेजबाबदारपणा ठपका ठेवून या पोलीस कर्मचाऱ्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. हे निलंबन मागे घ्यावे यासाठी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, तयार केलेला व्हिडिओमध्ये काहीच गैर नसल्याचे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

Amravati police Mahesh Kale
ट्वीट

अनेकांनी केला महेश काळेच्या कृत्याचा निषेध -

सोशल मीडियावर एकीकडे महेश काळे यांच्या व्हिडिओचे समर्थन करून त्याचे निलंबन मागे घेण्याची मागणी होत आहे. तर काही नेटकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांनी केलेली कारवाई योग्य असल्याचेही म्हटले आहे. तसेच, तर काही नेटकऱ्यांनी या कृत्याचा निषेध केला आहे.

Amravati police Mahesh Kale
ट्वीट

हेही वाचा - नयनरम्य! चिखलदऱ्यातील भीमकुंड धबधब्याचा मनमोहक ड्रोन VIDEO

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.