ETV Bharat / city

CA Topper Meenal Lahoti : सीएच्या परिक्षेत अमरावतीकर 'मीनल लाहोटी' देशात चौथी! - Amravati News

CA Topper Meenal Lahoti : राष्ट्रीय स्थरावर ( national stage ) होणाऱ्या या परीक्षेत देशभरातून लाखो विद्यार्थी परीक्षा देत असतात. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार मीनल लाहोटी ही देशातून चौथी, हर्षित केवळरामानी हा पाचवा तर रिद्धी कलंत्री ही देशातून 43 व्या रँकवर आली आहे.

मीनल लाहोटी
मीनल लाहोटी
author img

By

Published : Jul 21, 2022, 8:08 AM IST

Updated : Jul 21, 2022, 2:18 PM IST

अमरावती - 'दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया' ( The Institute of Chartered Accounts of India ) कडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेमध्ये येथील मिलन लाहोटी ही विद्यार्थिनी देशात चौथी आली आहे. तर हर्षिल केवळरामानी हा पाचवा रिद्धी कलंत्री 43 वी रँक मिळाली आहे. अमरावती शहरातील ( Amravati city ) एकूण 3 विद्यार्थी गुणवत्ता यादीत ( Student merit list ) आले आहेत. तर शहराभारतातून 25 विद्यार्थ्यांनी सीएची परीक्षा ( CA Exam ) उत्तीर्ण केली आहेत.

मीनल लाहोटी

सनदी लेखापाल ( सीए ) ची परीक्षा यावर्षीच्या मे महिन्यात घेण्यात आली होती. राष्ट्रीय स्थरावर ( national stage ) होणाऱ्या या परीक्षेत देशभरातून लाखो विद्यार्थी परीक्षा देत असतात. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार मीनल लाहोटी ही देशातून चौथी, हर्षित केवळरामानी हा पाचवा तर रिद्धी कलंत्री ही देशातून 43 व्या रँकवर आली आहे.

आई- वडिलांचीच प्रेरणा - माझ्या कुटुंबातील कोणीही वित्त क्षेत्रात नाही. परंतु, मला या क्षेत्रात येण्याची खूप इच्छा होती. माझे वडील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहे, तर आई शिक्षिका आहे. आई- वडिलांच्या प्रोत्साहनामुळे मी यश गाठू शकली. कुटुंबाने मला खूप मानसिक आधार दिला. असे मीनलने यावेळी सांगितले आहे.

कठोर मेहनत आणि अभ्यासात सातत्य - मोहनलाल सामरा शाळेमधून पुर्व प्राथमिक, 10 वी पर्यंतचे शिक्षण भवरीलाल सामरा, तर 12 वी पर्यंतचे शिक्षण केशरबाई लाहोटीमध्ये झाले आहे. 12 वी मध्ये महाराष्ट्र टॉपर असलेली मीनल सांगते की, मी दररोज 17 ते 18 तास अभ्यास करायची. कठोर परिश्रम आणि मेहनतिला शॉर्टकट्स नसल्याचे ती यावेळी सांगत आहे. देशात 5 वा आलेला हर्षिल आणि 43 व्या रँकवर आलेली रिद्धी आम्ही सोबतच अभ्यास करत होतो.

चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर - वित्त क्षेत्रात सनदी लेखापाल ( सीए ) म्हणून काम करणे हे आव्हान असते. येथे तुम्हाला आकड्यांशी खेळावे लागते. पण या क्षेत्रात पैसाही खूप आहे. ऑल इंडिया रँकमध्ये देशात 4 क्रमांक आल्यामुळे मला बऱ्याच कंपन्यानी चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर केले आहेत.अगदी सुरुवातीला 15 ते 18 लाखापर्यंत कंपन्या पॅकेज देत आहेत. पण अजून काही ठरवलं नसल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा - Letter of Raj Thackeray : मराठीच कार्यक्रम प्रसारित करा, राज ठाकरेंचे सह्याद्री वाहिनीला पत्र

Last Updated : Jul 21, 2022, 2:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.