अमरावती : बसापाचे प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार भाजपात जाणार (Chetan Pawar joins BJP) आहेत. गुरुवारी अमरावतीत आयोजित मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत अमरावती शहरात चेतन पवार हे भाजपात प्रवेश करणार (Chetan Pawar Chetan Pawar joins BJP in Amravati) आहेत.
चारवेळा नगरसेवक आणि माजी उपमहापौर -चेतन पवार हे चारवेळा नगरसेवक म्हणून अमरावती महापालिकेत निवडून आले आहेत. यापैकी तीनवेळा राष्ट्रवादी काँग्रेस आणि गेल्यावेळी बसपाचे उमेदवार म्हणून ते निवडून आले आहेत. अमरावती शहराचे उपमहापौर पद, महापलीलेचे स्थायी समिती सभापती तसेच बसपाचे गटनेते अशी पदं त्यांनी भूषविली (BSP state vice president Chetan Pawar) आहेत.
भाजपला होणार फायदा - बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार भाजपात येणार असल्यामुळे शहरातील राजपेठ, फ्रेजरपुरा, बेमोडा या प्रभागात भाजपला फायदा होणार असल्याचे भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले आहे. चेतन पवार यांच्यासह इतर पक्षातले आणखी काही नगरसेवक भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. मात्र प्रभागांचे आरक्षण कसे जाहीर होते ? यावर हे प्रवेश केले जाणार आहेत. आमचे नेते चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule in Amravati) यांचा विदर्भ दौरा जोरात सुरू असून भाजप बळकट होते आहे. भाजपात येणाऱ्यांना त्यांच्या अटी शर्तींनी नव्हे, तर पक्षाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे किरण पातूरकर म्हणाले.