अमरावती 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ( Upcoming Lok Sabha Elections ) महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे ( BJP Shiv Sena alliance ) पंचेचाळीस प्लस लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोनशे प्लस उमेदवार निवडून येतील असे भाजपचे नवनियुक्त महारराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे ( Chandrakant Bawankule ) यांनी म्हंटले आहे. प्रदेशाध्यक्ष्य बावनकुळे पहिल्यांदाच अमरावतीत आले असताना त्यांनी आपल्या नव्या जबाबदारिबाबत पत्रकरांशो संवाद साधला.
भाजपला बळकट करणार भारतीय जनता पक्ष ( BJP ) हा देशातील क्रमांक एकचा मोठा पक्ष आहे. असे असले तरी महाराष्ट्रात भाजपला आणखी बळकट करण्यासठी समाजातील सर्व घटकांना एकत्रीत आणून प्रयत्न केले जातील असे चंद्रकांत बावनकुळे म्हणले. भाजपचे नेते नितीन गडकरी ( Nitin Gadkari ), देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात भाजप नवी भरारी घेणार असेही चंद्रकांत बावनकुळे म्हणले.
महाराष्ट्रात सर्वत्र फडकणार भाजपचा झेंडा महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषद, ( Municipal elections ) ग्रामपंचायत अशा सर्व ठिकाणी भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास चंद्रकांत बावनकुळे यांनी व्यक्त केला. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन भाजप नवी भरारी घेणार असेही चंद्रकांत बावनकुळे म्हणले.
हेही वाचा - भाजपात खांदेपालट प्रदेशाध्यक्षपदी Chandrashekhar Bawankule तर मुंबई अध्यक्षपदी आक्रमक मराठा चेहरा